28.7 C
Gondiā
Monday, September 14, 2026
Home शैक्षणिक गोंदिया तालुक्यातील 8 अस्थिव्यंग विद्यार्थी शस्त्रक्रियेसाठी नागपूरला रवाना

गोंदिया तालुक्यातील 8 अस्थिव्यंग विद्यार्थी शस्त्रक्रियेसाठी नागपूरला रवाना

0
6

गोंदिया-समग्र शिक्षा, समावेशित शिक्षण व राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम च्या संयुक्त विद्यमाने गोंदिया जिल्ह्यातील 33 दिव्यांग अस्थीव्यंग विद्यार्थ्यांच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी आज गोंदिया तालुक्यातील ८ विद्यार्थी पालक व शिक्षकांसह महाराष्ट्र एक्सप्रेसने नागपूर येथील ‘Children Orthopaedic Care Institute’ कडे रवाना झाले. डॉ. विराज शिंगाडे यांच्या मार्फत या मुलांवर मोफत शस्त्रक्रिया होणार आहे.

नागपूर येथील प्रसिद्ध बाल अस्थिरोग तज्ञ डॉ विराज शिंगाडे, हे आपल्या प्रविरा ऑर्थोपेडिक केअर इन्स्टिट्यूट, अजनी नागपूर येथे गेल्या 20 वर्षापासून संपूर्ण विदर्भातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शस्त्रक्रिया मोफत करीत आहेत. यातच या वर्षी गोंदिया जिल्ह्यातील अश्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी दिनांक 03 ऑगस्ट 2026 रोजी पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात एकूण 98 विद्यार्थ्यांपैकी 33 मुलांना शस्त्रक्रिया करण्यासाठी निवडण्यात आले. यात गोंदिया तालुक्यातील अथर्व भूपेंद्र पारधी, धामणगाव ,विनीत विकास राऊत, तेडवा, कु. माही कैलास शहारे, झालुटोला,कार्तिक राजेश कावरे, धापेवाडा ,कु. खुशी राजेश डोंगरवार, कटंगीकला,प्रभात निशांत धमगाये, नगपुरा मुर्री, भोलासिंह मोहनसिंग बघेले, जब्बारटोला , जयसिंग मोहनसिंग बघेले, जब्बारटोला ही सर्व मुले आज नागपूर करीता महाराष्ट्र एक्सप्रेसने रवाना झाली आहेत. त्यांच्या सोबत पालक व विशेष शिक्षक नागपूर येथे शस्त्रक्रिया होई पर्यंत पूर्णवेळ राहणार अशी माहिती विशेष शिक्षक विजय ठोकणे यांनी दिली आहे.शिबिराच्या यशस्वितेसाठी जिल्हा समन्वय विलास मलवार, विजय ठोकणे, RBSK समन्वयक संजय बिसेन, DEIC व्यवस्थापक पारस लोणारे, गोंदिया तालुका समन्वयक राजकुमार गौतम तथा सर्व विशेष शिक्षक परिश्रम घेत आहेत.