गोंदिया, दि.17 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत “राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून” प्रवेश पात्रता परीक्षा दिनांक 7 जून 2026 रोजी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेचे आवेदनपत्र स्विकारण्याच्या अंतिम मुदतीमध्ये कमांडंट आर.आय.एम.सी., डेहराडून यांनी बदल केलेला असून आता या परीक्षेचे आवेदनपत्र स्विकारण्याची अंतिम मुदत 20 एप्रिल 2026 पर्यंत करण्यात आलेली आहे. असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.




