25.8 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ जिल्हा रुग्णालयात रुग्णांची हेळसांड

जिल्हा रुग्णालयात रुग्णांची हेळसांड

0
75

गोंदिया,दि.03-येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्याच्या ताब्यात असलेल्या कुवरतिलकसिंह जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांकडे वैद्यकिय अधिकारी यांचे दुर्लक्ष झाल्याने चांगलीच हेळसांड होत आहे.एका रुग्णाला काल बुधवारी लावलेली सलाईन संपल्यानंतरही दुसरी सलाईन लावण्यासाठी कुणीही परिचारिका व डाॅक्टर न फिरकल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांने सांगितले.तर याच वार्डात असलेल्या अनेक रुग्णांनी कालपासून एकही डाॅक्टर तपासणीसाठी आलाच नसल्याने आम्ही करावे तरी काय अशा प्रश्न उपस्थित करीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कारभारावर शंका व्यक्त केली आहे.