25.8 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home मराठवाडा/खान्देश ‘रतन’ इतिहासातील सर्वात भ्रष्ट ‘टाटा’

‘रतन’ इतिहासातील सर्वात भ्रष्ट ‘टाटा’

0
28

वृत्तसंस्था

रायपूर, दि. 3 – रतन टाटा हे टाटा समूहाच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट चेअरमन आहेत असा हल्लाबोल भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. इतक्यावरच स्वामी थांबले नाहीत, त्यांनी ‘रतन हे टाटा नसून त्यांच्या वडिलांनी त्यांना दत्तक घेतलं होतं’ असा घणाघाती आरोप केला आहे.
तसेच रतन टाटा हे सायरस मिस्त्रींवर अन्याय करत आहेत. दोन महिन्यांपूर्वी सायरस मिस्त्रींच्या कामाचं सर्वांनी कौतूक केलं होतं, मिस्त्रींचं सर्वांनी कौतूक करणं हे टाटांना पचलं नसेल म्हणूनच त्यांना पदावरून काढण्यात आलं असं ते रायपुरमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले.  2G घोटाळा, जॅग्यूअर विमानाच्या खरेदी प्रकरणातील घोटाळा तसेच एअर एशिया आणि विस्तारा विमानसेवेचे भागिदार बनतेवेळेस केलेले गैरव्यवहार आदी घोटाळ्यात टाटांचा सहभाग होता असा आरोपही त्यांनी केला.