कला शाखेतून क्रिश मधुलाल चौहान हा जिल्ह्यातून द्वितिय
देवरी,दि.०४- मनोहरभाई पटेल विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय, देवरी येथील इयत्ता १२वी च्या परीक्षेला सत्र २०२५-२६ ला विज्ञान शाखेत १५४,तर कला शाखेत १३४ विद्यार्थी बसले होते. या परीक्षेत महाविद्यालयाला सुयश प्राप्त झाले.
यापैकी विज्ञान शाखेचा ९८.७० टक्के तर कला शाखेचा८५.१७ टक्के निकाल लागला, कला शाखेतून क्रिश मधुलाल चौहान ९२.८३% गुण घेऊन गोंदिया जिल्ह्यात द्वितीय तर तालुक्यातुन प्रथम मान मिळवला, द्वितीय कावेरी प्यारेलाल वर्चो ८३.८३% व तृतीय महिमा कवलसिंग नेताम ८१% गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले, तर विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक कु.महक नुरेश चंदनमलागर ४३४ गुण, गुंजन शंकर राऊत ४३४ गुण , द्वितीय क्रमांक कु. सुचाली रमेश बिंझलेकर ३९९ गुण, तृतीय क्रमांक कु.स्नेहल राजेश बिंझलेकर ३९८ गुण संपादन केले,
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मा.संस्थापक वासुदेवरावजी गजभिये साहेब, संस्था सचिव मा. रामकुमारजी गजभिये साहेब, प्राचार्य जी.एम.मेश्राम, मुख्याध्यापक व्ही.एस.गेडाम, उपमुख्याध्यापक एस.पी. देशमुख, पर्यवेक्षक डी.एच. ढवळे, शाळा उपप्रमुख आर.एन.कारेमोरे, सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले .





