23.6 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home Top News मुरदोली गेट सुरू होताच चार वाघोबाचे दर्शन

मुरदोली गेट सुरू होताच चार वाघोबाचे दर्शन

0
161

गोंदिया –जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील मुरदोली गेट १ मे पासून सुरू करण्यात आले असून पहिल्या दिवशी पर्यटकांना व्याघ्र दर्शन झाले असताना रविवारी ३ मे रोजी तिसर्‍या दिवशीच चार वाघांनी एकत्र दर्शन दिल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.यातील काही पर्यटकांनी या वाघांचे व्हिडीओ काढून ते सोशल मिडीयावर व्हायरल केले आहे.

काही दिवसांपूर्वी मुरदोली जंगल शिवारात बंड तलाव परिसरात तीन वाघांचे एका सोबत दर्शन झाल्याची घटना घडली होती. त्यातच रविवारी पुन्हा चार वाघ दिसून आल्याने या परिसरात वाघाचे अधिवास असल्याचे सिद्ध होत आहे. त्यातच नवेगाव-नागझिराच्या मुरदोली प्रवेशद्वार सुरु झाल्याने गोंदिया जिल्ह्यातील अनेक नागरिक या मुरदोली गेटच्या माध्यमातून सफारी करीत टायगर पाहण्याच्या आनंद लुटता येणार आहे. त्यातच रविवारी मुरदोली गेटवरून पर्यटक रितेश शहारे सफारी करीत असताना एका सोबत चार वाघ त्यांना दिसले. यावेळी रितेश शहारे या हौशी पर्यटकांनी या वाघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. विशेष म्हणजे, या गेटमधून व्याघ्र दर्शन झाल्यामुळे आता पर्यटनाला चालना मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

blank