26.9 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home विदर्भ वडेगाव महसूल मंडळातील शेतकरी पिक विमा रक्कमेपासून वंचित

वडेगाव महसूल मंडळातील शेतकरी पिक विमा रक्कमेपासून वंचित

0
89

चित्रा कापसे
तिरोडा,दि.०९-तालुक्यातील पाच महसूल मंडळापैकी चार महसूल मंडळामध्ये पिक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात एक महिना आधी जमा झाली.परंतु वडेगाव महसूल मंडळातील पिक विमा रक्कम अद्यापही शेतकरी बँक खात्यात जमा न झाल्याने प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने तहसिलदारांना निवेदन देत पिक विमा कंपनीवर कारवाईची मागणी करण्यात आली. पीक विमा रक्कम न मिळाल्याने शेतकरी संभ्रमात असून पिक विमा पावतीवरील टोल फ्री नंबर वर फोन केल्यावरही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे शेतकरी यांनी निवेदनात म्हटले आहे.वडेगाव सर्कल शेतकऱ्यांना आठ दिवसात खरीप धान पिक विमा रक्कम शेतकरी याच्या बँक खात्यात जमा झाली नाही तर प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने कृषी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

blank