30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ जिल्हा बार असोसिएशनच्या नवनियुक्त पदाधिकारी वकिलांचा सत्कार

जिल्हा बार असोसिएशनच्या नवनियुक्त पदाधिकारी वकिलांचा सत्कार

0
119

blank

डॉ आंबेडकर जयंतीच्या कार्यकर्त्यांना प्रमाणपत्राचे वितरण कार्यक्रम उत्साहात
गोंदिया ता. 12: जिल्हा बार असोसिएशनच्या नवनियुक्त पदाधिकारी वकिलांचा सत्कार आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे परिश्रमी व कलावंत कार्यकर्त्यांना प्रशस्ती पत्राचे वितरण कार्यक्रम उत्साहात झाला.
श्रीनगर येथील जेतवन बुद्ध विहारात हा कार्यक्रम आयोजित करण्यात येऊन गोंदिया जिल्हा बार असोसिएशन चे नवनियुक्त अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार्मुर्ती ऍड सचिन बोरकर, तसेच ऍड एकता गणवीर, एक्झिक्युटिव्ह मेंबर, ऍड परवेझ शेख, ट्रेझनर यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जयंती समितीचे अध्यक्ष अरविंद भावे हे होते. मंचावर सत्कार मूर्ती यांच्यासह दिनेश उके, नानाजी शेंडे, कविता उके उपस्थित होते. ऍड सचिन यांनी तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुर्त्यांना अभिवादन करुण कार्यक्रमांची सुरुवात झाली. मंचावर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना, फुले आंबेडकरी विचारधारा आत्मसात केल्याशिवाय पर्याय नाही असे सांगितलं.
दरम्यान माध्यमिक शालांत परीक्षेत खुशी सुखदेवे,यां विद्यार्थिनीने 99.60% गुण मिळवून गोंदिया जिल्हा टॉपर ठरली आहे. त्यामुळे तिचा सत्कार करुण समितीच्या वतीने कौतुक करण्यात आले.दरम्यान तथागत बुद्ध जयंतीनिमित्त आयोजित मीरवणुकी दरम्यान ज्या कार्यकर्त्यांनी विविध देखाव्यांच्या माध्यमातून उत्कृष्ठ सादरीकरण केलं त्यांनाही जयंती समितीच्या वतीने प्रशस्ती पत्र देऊन अभिनंदन करण्यात आलं. यां कार्यकर्त्यांमध्य राजश्री गोंडणे आणि समूह, भूमिका रामटेके आणि समूह, तक्षशीला गडपायले आणि समूह अनिल मोर्य आणि समूह,नानाजी शेंडे आणि समूह,सुशील गणवीर आणि समूह यांचा समावेश आहे. मीरवणुकीतील देखाव्या दरम्यान चिमुकल्याणी महामानवांच्या भूमिका साकारल्यात यामध्ये आरोही आनंद मेश्राम यांनी, तथागत बुध्दाची,आयरा अनिल मौर्या यांनी माता रमाईची,दिव्यांश मनोज रंगारी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांची, श्रेयस जितेंद्र देशभ्रतार यांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांची ,अर्पिता रुपेश नागदेवे यांनी सावित्रीमाई फुल्यांची भूमिका साकारली, हर्ष गोंडाने,हर्षित रामटेके, आदि भौतमांगे,आरुष मेश्राम, रोणीत बंसोड,उमंग मडावी,सावी रामटेके,तन्वी बोरकर, साची विशाल देशभ्रतार, योष्णा प्रमोद लांजेवार, अर्विक विशाल डहाट, पूजा बनसोड, प्रांजल बनसोड, वीर अर्जित, आरजू वैद्य, माही वैद्य, शैवी वैद्य, नीती मेश्राम हे प्रशस्ती पत्राचे मानकरी ठरले.तसेच विलास वासनिक, अंकुर गजभिये, पृथ्वीराज कोल्हटकर यांनाही प्रमाणपत्र देऊन त्यांच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद भावे यांनी,संचालन सुशील गणवीर यांनी तर आभार पराग मेश्राम यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ,अंकुर गजभिये, नूरलाल उके, ताजाराम उके आणि जयंती समितीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

blank