दापोली-राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी खरे काय आणि खोटे काय यावर लोकांना चर्चा करायला लावली. परंतु ही चळवळ महात्मा फुले यांच्यानंतर संपते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाच कोकणचे गाडगेबाबा मारुतीकाका उर्फ महादेव जालगावकर यांनी सत्यशोधक चळवळीला कोकणात ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचे काम गेली अनेक वर्ष सुरू आहे. नुकतेच दापोली तालुक्यातील उंबर्ले येथे त्यांचा 83 वा वाढदिवस सत्यशोधक पद्धतीने साजरा करण्यात आला.
आपल्या वडिलांचा वाढदिवस अशाप्रकारे साजरा व्हावा यासाठी शिवश्री महेंद्र जालगावकर यांची संकल्पना होती. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मारुतीकाका जोशी यांनी भूषविले. तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना सत्यशोधक समाजाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे यांनी सांगितले की, हा वाढदिवस केक कापून घरातही साजरा करता आला असता. मात्र महेंद्र जालगावकर यांनी तसा निर्णय घेतला नाही. त्याला कारण समाजात असलेल्या रूढी व परंपरा यांना छेद द्यायचा होता. त्यासाठी हा कार्यक्रम आहे.
ते पुढे म्हणाले कि आपले महापुरुष कुठले व त्यांचा इतिहास काय हे समजून घेणे गरजेचे आहे. आपण सांस्कृतिक गुलामी भेदून काम केले पाहिजे. किती दिवस व्यवस्थेचे गुलाम म्हणून काम करायचे. आम्ही बळीपूजा हा बहुजन समाजाला पर्याय दिला आहे. लोकांनी तो पर्याय स्विकारून इथली व्यवथा नष्ट केली पाहिजे. महेंद्र जाळगावकर यांनी केलेला कार्यक्रम समाजाला दिशा देणारा आहे. त्यामुळे यापुढे आपल्यातूनच शिव प्रवर्तक निर्माण झाले पाहिजेत. जेणेकरून ही सत्यशोधक समाजाची पालखी पुढे घेऊन जाण्यास मदत होणार आहे.
यावेळी प्रदीप कांबळे यांनी लोकांच्या मनाचा ठाव घेत मार्मिक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात सत्यशोधक समाजाच्या पद्धतीने कशाप्रकारे बळी अथवा संत रोहिदास पूजा केली जाते. सत्यशोधक समाजाने सत्यनारायण पूजेला बळीपूजा हा पर्याय दिला आहे. त्याच बरोबर मरणोत्तर पिंडदान न करता केवळ फोटो पूजन करून उत्तर कार्य केले जाते. भूमिपूजन, गृहप्रवेश, नामकरण, वाढदिवस, लग्न हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून व तर्कावर आधारित कुठलेही कर्मकांड न करता केले जाते. या सर्व संस्काराचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. लग्न संस्कारात शुभ मंगल सावधान असे न म्हणता शिवमंगल सत्यध्यान असे म्हटले जाते. शेवटी महादेव जालगावकर यांनी उपस्थित लोकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाने उपस्थित लोक मंत्रमुग्ध झाले.
दापोली/दै.मू.वृत्तसेवा
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी खरे काय आणि खोटे काय यावर लोकांना चर्चा करायला लावली. परंतु ही चळवळ महात्मा फुले यांच्यानंतर संपते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाच कोकणचे गाडगेबाबा मारुतीकाका उर्फ महादेव जालगावकर यांनी सत्यशोधक चळवळीला कोकणात ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचे काम गेली अनेक वर्ष सुरू आहे. नुकतेच दापोली तालुक्यातील उंबर्ले येथे त्यांचा 83 वा वाढदिवस सत्यशोधक पद्धतीने साजरा करण्यात आला.