25.1 C
Gondiā
Tuesday, July 28, 2026
Home राष्ट्रीय देश मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, पुरावे नष्ट करण्यासाठी नोट्सही जाळल्या, सीबीआयच्या...

मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, पुरावे नष्ट करण्यासाठी नोट्सही जाळल्या, सीबीआयच्या तपासातून उघड

0
73
पुणे/वृत्तसेवा-नीट पेपर लीक प्रकरणात सीबीआयने पुण्यातील शेठ हिरालाल सराफ प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनीषा हवालदार यांना शुक्रवारी अटक केली. त्यांची चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनीषा हवालदार हिने फिजिक्सचे प्रश्न पैशे घेऊन विकल्याची माहिती सीबीआयच्या तपासातून समोर आली आहे. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी प्रश्नसंचाचे नोट्स जाळल्याचे देखील तपासात उघड झाले आहे.
राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) नीट परीक्षेसाठी मनीषा हवालदार हीची भौतिकशास्त्र विषयाच्या तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती. त्यामुळे प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या अत्यंत गोपनीय प्रक्रियेची माहिती आणि प्रश्न थेट तिच्याकडे उपलब्ध होते. या गैरफायदा घेत मनीषा हवालदारने नीट संबंधित प्रश्नांच्या हस्तलिखित नोंदी तयार करून स्वतःकडे ठेवल्या होत्या. संबंधित प्रश्न व्हॉट्सअँप आणि प्रिंटआउट काढून दिले, त्याबदल्यात रोख रक्कम स्वीकारली, अशी माहिती समोर येत आहे.
तपास यंत्रणांना संशय येऊ नये किंवा कोणताही पुरावा हाती काही लागू नये म्हणून आरोपी मनीषा हवालदार हिने भौतिकशास्त्र विषयाचे प्रश्न असलेल्या नोट्स जाळून नष्ट केले. तसेच हवालदारने मनीषा मांढरेसोबत केलेले चॅटिंग सुद्धा डिलिट करण्यात आले आहे. मनिषा हवालदार आणि मनिषा मांढरेमध्ये व्हॉट्सअॅप चॅट झाले होते, त्याचे मेसेज डिलिट करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, हवालदारने पतीच्या फोनवरून सुद्धा मनिषा मांढरेला प्रश्न पाठवल्याची माहिती सीबीआय तपासातून समोर आली आहे.
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मनिषा हवालदार यांनी भौतिकशास्त्राचे प्रश्न मनीशा मांढरे यांना दिल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) नीट परीक्षेसाठी मनीषा हवालदार हीची भौतिकशास्त्र विषयाच्या तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती. त्यामुळे प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या अत्यंत गोपनीय प्रक्रियेची माहिती आणि प्रश्न थेट तिच्याकडे उपलब्ध होते. एप्रिल 2026 दरम्यान तिने भौतिकशास्त्राचे काही प्रश्न मनीषा मांढरे यांना दिल्याचे तपासातून समोर आले आहे. तपासादरम्यान, हवालदार हिने लीक केलेले प्रश्न आणि प्रत्यक्ष नीटच्या परीक्षेत आलेले प्रश्न तंतोतंत जुळल्याचे सीबीआयने म्हटले आहे.
सीबाआयने मनीषा हवालदारचा मोबाईला ताब्यात घेतला असून डाटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे तपासात धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणेनं मनिषा हवालदारच्या राहत्या घरातून महत्त्वाची कागदपत्रं, कम्प्यूटरची हार्ड डिस्क आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केलीे आहेत.
नीट पेपरलीक प्रकरणात मनीषा मांढरे यांनी देखील अशीच शक्कल लढवली आहे. तिने देखील कोणताही पुरावा मागे सोडला नाही. त्यामुळे तपासात अडचणी येत आहेत. मनीषा मांढरेची स्मरणशक्ती चांगली असल्यामुळे तिने जिवशास्त्राचे सर्व प्रश्न तोंडपाठ केले आणि बाहेर आल्यानंतर ते हाताने लिहून काढले. मनीषा मांढरेनेच्या या ट्रिकने सीबीआयही च्रकावली आहे. दरम्यान, नीट पेपेरफुटीतील अन्य आरोपी मनीषा वाघमारे हिने चौकशीत मनीषा मांढरेचं नाव घेतल्यानंतर सीबीआयने तिला अटक केली.
सीबीआय तपासातून या घोटाळ्याचा मुख्य कट पुण्यात रचला गेल्याची माहिती यापूर्वीच समोर आली आहे. जीवशास्त्राच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे आणि लातूरमधील केमेस्ट्रीचा निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांनी मिळून जानेवारी महिन्यातच हा कट रचला. त्यांनी हाताने लिहिलेले प्रश्न आणि उत्तरे शिवराज मोटेगावकर यांना पाठवली. यानंतर मोटेगावकरने ते पीडीएफच्या स्वरुपात मोबाईलमधे सेव्ह करुन ठेवले आणि त्याचे पीडीएफ बनवून पैशांच्या बदल्यात निवडक विद्यार्थ्यांना विकले. परीक्षा आटोपल्यानंतर मोटेगावकरने मोबाईलमधून ते डिलीट करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र सीबीआयने मोबाईलमधील डेटा रिकव्हर केल्यानंतर मोटेगावकर याला अटक केली.

blank