गोंदिया-भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीआय) राष्ट्रीय आणि राज्य परिषदेच्या आवाहनानुसार, “सार्वजनिक मुद्द्यांवरील जनसंपर्क जनसंवाद मोहीम” अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील कार्यक्रमांना अंतिम रूप देण्यासाठी कॉ. शेखर कनोजिया, राज्य सचिवालयाचे सदस्य कॉ. शिवकुमार गणवीर आणि कार्यकारीणी सदस्य कॉ. हौसलाल रहांगडाले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत आगामी कार्यक्रम निश्चित करण्यात आले. या बैठकीत सीपीआयचे जिल्हा सचिव मिलिंद गणवीर यांनी जिल्ह्याच्या संघटनात्मक स्थितीबद्दल आणि आयोजित कार्यक्रमांविषयी माहिती दिली. भाजप सरकारच्या जनविरोधी, हुकूमशाही आणि विभाजनवादी धोरणांविरुद्ध मोठा जनआंदोलन घडवण्यासाठी सीपीआय ही मोहीम सुरू करणार आहे. १ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट या कालावधीत अभूतपूर्व बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूंच्या गगनाला भिडणाऱ्या किमती, गंभीर होत चाललेले कृषी संकट, मजुरांच्या हक्कांवर होणारे वाढते हल्ले,धार्मिक,जातीय ध्रुवीकरण आणि लोकशाही संस्था व संघराज्यवादावरील पद्धतशीर हल्ले, आरक्षण लागू न करून महिलांचा होणारा सततचा विश्वासघात, सामाजिक न्यायाचे कमकुवत होणे, अत्यावश्यक क्षेत्रांचे वाढते खाजगीकरण आणि काही कॉर्पोरेट समूहांच्या हातात असलेली आर्थिक सत्ता इत्यादी मुद्द्यांवर जिल्ह्यात व्यापक पायी मोर्चे,प्रचार प्रसिद्धी सभा आणि पत्रकांचे वाटप करण्याचे ठरले आयोजित केले मिलिंद गणवीर यांनी माहिती दिली की की, ही मोहीम कामगार, शेतकरी, शेतमजूर, युवक, महिला, विद्यार्थी, अल्पसंख्याक, दलित, आदिवासी यांची घटनात्मक मूल्ये, त्यांची उपजीविका आणि प्रजासत्ताकाची धर्मनिरपेक्ष व लोकशाही रचना यांचे संरक्षण करण्यासाठी एक व्यापक मोहीम असेल. आणि २८ सप्टेंबर रोजी दिल्लीत एक भव्य देशव्यापी रॅली काढण्यात येईल. या सभेत महिला महासंघ आणि किसान सभेची पुनर्रचना करण्याचा निर्णयही घेण्यात आला. या बैठकीला कॉ.रामचंद्र पाटील, गुणवंत नाईक, शालूताई कुथे , कल्पना डोंगरे,दुलीचंद कावळे,जितेंद्र गजभिये, सुरेश रंगारी, डोमाजी बावनकर, पौर्णिमा चुटे आदी उपस्थित होते.





