37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ भीषण आगीत वनविभागाचा घोट डेपो जळून खाक, मोठी हाणी

भीषण आगीत वनविभागाचा घोट डेपो जळून खाक, मोठी हाणी

0
48

blank

गडचिरोली : घोट येथील वनविभागाच्या लाकूड डेपोला रविवारी संध्याकाळी लागलेल्या भीषण आगीत 250 ते 300 मिश्र बिट जळून खाक झाले. अवघ्या काही क्षणात आग पसरल्याने रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरूच होते. डेपोच्या शेजारी असलेल्या शेतात तण जाळण्यासाठी लावलेली आग हवेमुळे डेपोपर्यंत पसरून डेपोतील लाकडांनी पेट घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

संध्याकाळी 5.30 ते 6 च्या सुमारास आग लागल्याचे निदर्शनास आले. सुरूवातीला ही आग नियंत्रणात असल्याचे वाटत होते, मात्र काही वेळानंतर वाऱ्याची दिशा बदलली आणि आगीने रौद्र रूप धारण केले. काही वेळातच आगीचे लोळ वनविभागाच्या लाकूड डेपोकडे सरकले आणि तेथील मिश्र बिटांनी पेट घेतला.

हे बिट वनविभाग व जंगल कामगार संस्था पळसगाव यांच्याशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले. मुख्य डेपो व्यतिरिक्त काही अंतरावर दुसऱ्या ठिकाणीही आग लागून तेथील सुमारे 8 ते 10 बिट जळाले आहेत. या आगीची माहिती मिळाल्यानंतर घोटचे वनपरिक्षेत्र अधिकारी वाडीघरे घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ चामोर्शी नगर पंचायतीच्या अग्निशामक दलासह कोनसरी येथील लॅायड्स मेटल्सचे अग्निशमन बंब पाचारण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते.

blank