
गोंदिया : जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी जिल्ह्यातील अवैध अंमली पदार्थ बाळगणारे, विक्री, साठा आणि वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशान्वये स्थानिक गुन्हे शाखा (LCB) गोंदियाचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या नेतृत्वाखालील पथक २४ मे रोजी डुग्गीपार पोलीस स्टेशन हद्दीत गस्तीवर होते. यादरम्यान रायपूर (छत्तीसगड) येथून एका काळ्या रंगाच्या ‘महिंद्रा थार’ कारमधून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ०६ वरून देवरी-कोहमारा मार्गे नागपूर येथे मोठ्या प्रमाणात गांजा नेला जात असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती एलसीबीला मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून डुग्गीपार अंतर्गत येणाऱ्या सौंदड रेल्वे उड्डाणपुलाजवळ नाकाबंदी केली. काही वेळातच रायपूरकडून एक काळ्या रंगाची थार कार (किंमत १५,००,०००/- रु.) येताना दिसली. मात्र, समोर पोलिसांची नाकाबंदी पाहताच आरोपींनी कार विरुद्ध दिशेच्या रस्त्याने पळवण्याचा प्रयत्न केला.
या कारवाईत पोलिसांनी खालील आरोपींना अटक केली व काहींवर गुन्हा दाखल केला आहे:
1. विवेककुमार अश्विनीकुमार जोशी (वय २१ वर्ष, रा. डोंगरगढ, जि. राजनांदगाव, छ.ग.) — (अटक)
2. एक विधीसंघर्ष बालक (रा. नारायणगड चिचोला, ता. डोंगरगढ, जि. राजनांदगाव, छ.ग.) — (ताब्यात)
3. सुफियान उर्फ सोफी रजा (वय २८ वर्षे, रा. रज्जानगर, डोंगरगढ, छ.ग.) — (पळून गेलेला तिसरा आरोपी)
4. सागर खोब्रागडे (रा. नागपूर) — (ज्याला गांजा विकला जाणार होता)
अटक केलेला आरोपी विवेककुमार जोशी याच्याकडे चौकशी केली असता, हा गांजा नागपूर येथील सागर खोब्रागडे याला विकण्यासाठी नेला जात असल्याचे त्याने कबूल केले. या चारही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या नेतृत्वात पुढील पथकाने केली सपोनि धिरज राजुरकर,पो.हवा. तुलसीदास लुटे, दिक्षितकुमार दमाहे, संजय चव्हाण, दुर्गेश तिवारी, प्रकाश गायधने, सार्मेंद्रसिंह तुरकर,पो.शि. सुनील डहाके, इंदुरकर चालक पो.शि. घनश्याम कुंभलवार, राम खंदारे, लक्ष्मण बंजार या मोठ्या कारवाईमुळे आंतरराज्यीय गांजा तस्करांचे धाबे दणाणले असून गोंदिया पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.





