गोरेगाव : जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र रकाणा नसल्याने ओबीसी बहुजन महासंघाच्या वतीने ठाणा चौकातून तहसील कार्यालयापर्यंत बाईक रॅली काढत सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. रॅलीतून ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी अन्यथा जनगणनेवर बहिष्कार टाकणार अशी मागणी करीत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
देशांतर्गत होणाऱ्या जनगणनेत इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसींचा रकाना नसल्याने ही जणगणना आम्हाला मान्य नाही. त्यामुळे आम्ही सर्व ओबीसी समाज बांधव या जणगणेवर बहिष्कार करित असल्याचे प्रतिपादन यावेळी माजी खासदार डॉ. खुशालचंद्र बोपचे यांनी केले. यावेळी समस्त ओबीसी बांधवांनी जणगणेचा तीव्र विरोध करून बहिष्कार केला. केंद्र सरकारकारने ओबीसींची जणगणना करण्याची मान्यता दिली होती मात्र मे २०२६ मध्ये होणाऱ्या संपूर्ण भारतभर जणगणेत ओबीसी करिता स्वतंत्र रकानाच नाही. त्यामुळे ओबीसी समाज बांधवांची जणगणना होणारच नाही हे सर्व समाज बांधवांना समजले. त्यामुळे या देशात बहुसंख्य ओबीसी असलेल्या समाजाची जणगना होणार नाही तर ओबीसी समाज बांधवाना मिळणाऱ्या सोई सुविधा, पुढील पिढीला मिळणारे आरक्षण यापासून वंचित राहावे लागेल. हे लक्षात घेऊन ओबीसी समाज बांधवांनी एल्गार पुकारत जणगणेवर बहिष्कार घातला आहे.
ओबीसींचा रकाना नसणे म्हणजे ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष करून ओबीसी समाजाला सोई सुविधांपासून वंचित ठेवण्याचा घाट आहे. एकप्रकारे ओबीसींना विकासापासून दूर ठेवण्याचा मानस असून हे खपवून घेणार नाही. ओबीसी आता जागा झाला आहे त्यामुळे या जणगणनेला ओबीसी समाज तीव्र विरोध करीत असून बहिष्कार करित आहे. जणगणना ही देशाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक धोरणाची पायाभरणी असते अशा महत्त्वाच्या प्रकिया मधे ओबीसी समाजाला स्थान न देणे, ओबीसींची नोंद न घेणे म्हणजेच भाविष्यातील आरक्षण, कल्याणकारी योजना व हक्कांपासून दूर ठेवण्याचा प्रकार असल्याचा आरोप ओबीसी समाजाने केला आहे. यावेळी नगराध्यक्ष तेजराम बिसेन, उपाध्यक्ष मलेशाम येरोला, जगदीश येरोला, रविकांत बोपचे, रेवेन्द्र बिसेन, भुमेश ठाकरे, व्ही. टी. पटले, महेश चौधरी, ओमप्रकाश कटरे, वाय. आर. चौधरी, डॉ.एल.एस. तुरकर, गोपाल ठाकरे, कमलेश बारेवार, टेकेश रंहागडाले, बि. आर. गौतम, भुषण कावळे आदी बहुसंख्य ओबीसी समाजबांधव उपस्थित होते.





