38.2 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय शिवसेना उबाठातर्फे पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध

शिवसेना उबाठातर्फे पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध

0
24

blank

भंडारा _ मागील दोन महिन्यापासून दर आठ दिवसांनी देशांमध्ये पेट्रोल डिझेलचे, गॅस सिलेंडरचे दर वाढवून सामान्य जनतेचे जगणे कठीण केले त्यांनी निषेधार्थ शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षातर्फे आज 3 जून रोजी भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

सध्याच्या घडीला कच्च्या तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय पातळीवरती स्थिर असताना सुद्धा देशांतर्गत पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर चे दर प्रत्येक आठवड्याला वाढतांनी दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव हे आज जेवढे आहे तेवढेच म्हणजे 110 , 112 रुपये प्रति बॅरल भाव हा 2014  सुद्धा होता. मग त्यावेळेस पेट्रोलचे भाव प्रति लिटर 70 रुपये ,सिलेंडरचे भाव 425 रुपये होते. असे असताना आजही कच्च्या तेलाचे भाव जवळपास तेवढेच आहे परंतु जनतेला मात्र पेट्रोल प्रति लिटर 11 रुपये ते सुद्धा इथेनॉल मिक्स करून आणि सिलेंडर 975 रुपये ला उपलब्ध करून केंद्र आणि राज्य शासन एक प्रकारे जनतेची लूट करत आहेत.त्यामुळे या सरकारचे खरे रूप आता देशातील जनतेला कळले असून या सरकारला देशातील जनतेची कुठलीही चिंता नाही हे यावरून स्पष्ट होते. त्यामुळे या सरकारने आता देशातील जनतेला मूर्ख बनवण्याचे काम थांबवून देशाच्या पंतप्रधानांनी ‘ मन की बात ‘ नाही तर आता ” जन की बात” ऐकण्याचे आव्हान हे आंदोलनातून करण्यात आले.

या आंदोलनात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, जिल्हा संघटक लवकुश निर्वाण उपजिल्हाप्रमुख किशोर तलमले, तालुकाप्रमुख तिलक सर्वे, प्रमोद मेश्राम, मधु बुराडे, दिनेश नंदपुरे, शहर प्रमुख राकेश आग्रे, शहर संघटक मयूर जोशी , प्रशांत देशमुख, शहर समन्वयक ईश्वर टाले, उप तालुकाप्रमुख गुरुदेव साकुरे, राजू नान्हे, निलेश चामट चित्रांगंद सेलोकर, हर्षल टेंभुरकर, अनिरुद्ध गाढवे, सोमेश्वर सेलोकर, अतुल मिरासे , जितेंद्र हरकंडे, राज वधवानी, गोपीचंद गोमासे, भोजराज भेंडारकर, मिरज बडवाईक, सुनील सूर्यवंशी, सुनील बडवाईक, भगवान कोवेकर इत्यादी अनेक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

blank