24.5 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home राजकीय किमान आधारभूत किंमत (MSP) खरेदी योजनेच्या अभ्यासगट अध्यक्षपदी आमदार फुके

किमान आधारभूत किंमत (MSP) खरेदी योजनेच्या अभ्यासगट अध्यक्षपदी आमदार फुके

0
110
मुंबई,दि.१२ः राज्य सरकारच्या २०२६ मध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने छत्तीसगड राज्यातील किमान आधारभूत किंमत (MSP) खरेदी योजनेच्या अंमलबजावणीचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष अभ्यासगटाच्या अध्यक्षपदी विधानपरिषदेचे सदस्य आमदार डाॅ.परिणय फुके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या हिताशी निगडित असलेल्या या महत्त्वपूर्ण विषयाचा सखोल अभ्यास करून त्यातील सकारात्मक बाबींचा आढावा घेणे आणि राज्यातील शेतकऱ्यांना लाभदायी ठरतील अशा उपाययोजनांबाबत शिफारसी करणे, ही या अभ्यासगटाची जबाबदारी असेल.आमदार फुके यांनी ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविल्याबद्दल महाराष्ट्र विधानमंडळाचे आणि अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे आभार मानत शेतकरी हित आणि कृषी विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे म्हटले आहे.