33.9 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home राजकीय पक्षश्रेष्ठींचा विश्वास व जनआशिर्वादाला तडा जावू देणार नाही : खा. राजेंद्र जैन

पक्षश्रेष्ठींचा विश्वास व जनआशिर्वादाला तडा जावू देणार नाही : खा. राजेंद्र जैन

0
5

blank

गोंदिया : पक्षश्रेष्ठींनी माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला खासदार करून राज्यसभेत संधी दिली. आजपावेतो आणि पुढेही पक्षाचा प्रामाणिकपणे काम करणार आहे. वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांचे पालन, पक्ष बळकटीकरण व पक्षाने सोपविलेली जबाबदारी अत्यंत प्रामाणिकरित्या पार पाडत आहे. पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर दाखविलेला विश्वासाला तडा जावू देणार, अशी ग्वाही खा. राजेंद्र जैन यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस (अप) गटाच्या वतीने गोंदियाचे माजी आमदार राजेंद्र जैन यांची राज्यसभेवर वर्णी लागली. अविरोध निवड झाल्यानंतर राजेंद्र जैन यांचे (ता. १२) गोंदिया शहरात प्रथम आगमन झाले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस व त्यांच्या मित्र परिवाराकडून जंगी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी आयोजित सत्कार कार्यक्रमाला संबोधित ते बोलत होते.
खा. राजेंद्र जैन यांचे गोंदिया शहरात सकाळी ९ वाजता सुमारास आगमन झाले. सर्वप्रथम त्यांनी खा. प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी जावून स्व. मनोहरभाई पटेल यांच्या पूर्णाकृतीला माल्यार्पण केले. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजित जनआशिर्वाद रॅलीत सहभागी झाले.blank दरम्यान गोंदिया शहरातील महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, जमनालाल बजाज यासह महापुरुषांच्या पूर्णाकृतीला मार्त्यापण केले. मोठ्या वाज्यागाज्यात निघालेल्या रॅलीच्या माध्यमातून खा. राजेंद्र जैन यांनी शहरवासीयांचाही आशिर्वाद घेतला. त्यानंतर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यक्रमात खा. प्रफुल पटेल यांचा जाहिर सत्कार करण्यात आला. यावेळी खा. राजेंद्र जैन पुढे म्हणाले, पक्षनेत्री उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, खा. पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे, मंत्री छगन भुजबळ, ना. दिलीप वळसे पाटील व खा. प्रफुल पटेल यांनी आपल्यावर विश्वास दाखवून राज्यसभेत काम करण्याची संधी दिली. पक्षाच्या सुचनेनुरूप आपल्या कामगिरीतून संधीचे सोने निश्चित करू, गोंदिया-भंडारा या दोन्ही जिल्ह्यासह पुर्व विदर्भात पक्ष बळकट करण्याचे कामही प्राधान्याने करणार, पक्ष कार्यकर्त्यांनी खा. प्रफुल पटेल यांच्या पाठिशी राहून सर्वसामान्यांच्या समस्या जाणून विशेषतः शेतकऱ्यांच्या समस्यांना मार्गी लावण्याचे काम करावे, शासनस्तरावर कोणतीही अडचण आल्यास थेट संपर्क करावे, आम्ही सदैव सेवेत तत्पर राहू, असाही विश्वास निर्माण केला.
यावेळी मंचावर जिल्हाध्यक्ष प्रेम रहांगडाले, जि. प. उपाध्यक्ष सुरेश हर्षे,नगर परिषदेच्या नगर  व रचना विभागाच्या सभापती निर्मला दिलीप मिश्रा, जि. प. सदस्य यशवंत गणवीर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष केतन तुरकर, अखिलेश सेठ, जि. प. सदस्य अश्विनी रवी पटले, नेहा केतन तुरकर, किरणकुमार पारधी, जगदिश बावणथडे, पुजा अखिलेश सेठ, सुधा डी. रहांगडाले, रवि पटले,लोकेश यादव,सतिश देशमुख,हेमंत पंधरे,पकंज मिश्रा,सोनु राय,मजुर संघाचे अध्यक्ष बंटी मिश्रा,उपाध्यक्ष दिपक कदम यांच्याह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.