32.4 C
Gondiā
Thursday, June 25, 2026
Home विदर्भ डिजिटल क्रिएटर्ससोबत जिल्हाधिकाऱ्यांचा संवाद जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र काम करू – जिल्हाधिकारी सावनकुमार

डिजिटल क्रिएटर्ससोबत जिल्हाधिकाऱ्यांचा संवाद जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र काम करू – जिल्हाधिकारी सावनकुमार

0
18

भंडारा, दि. २५ : सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडिया व विविध डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर माहिती नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. डिजिटल कंटेंट क्रिएटर्स हे समाजमन घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असूनभंडारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विशेषतः पर्यटनसंस्कृतीऐतिहासिक वारसापर्यावरण संवर्धन तसेच शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत सकारात्मक व माहितीपूर्ण कंटेंट तयार करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी केले.

जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या संवाद बैठकीत जिल्ह्यातील विविध डिजिटल कंटेंट क्रिएटर्सइन्फ्लुएन्सर्स व सोशल मीडिया प्रतिनिधींशी जिल्हाधिकाऱ्यांनी मुक्त संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करण्याची गरज अधोरेखित केली. तसेच पर्यटनस्थळेस्थानिक कला-संस्कृतीयशोगाथा आणि विकासकामे यांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन व डिजिटल क्रिएटर्स यांनी समन्वयाने काम करावेअसे त्यांनी सांगितले.

बैठकीत उपस्थित डिजिटल क्रिएटर्सनीही विविध सूचना व अनुभव मांडले. जिल्ह्यातील सकारात्मक घडामोडीपर्यटन क्षमता आणि स्थानिक वैशिष्ट्यांना डिजिटल माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली.यावेळी जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ आपत्ती व्यवस्थापन पथकाचे अभिषेक नामदास,जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्ह्यातील 15 विविध डिजिटल कंटेंट क्रिएटर्स उपस्थित होते