32.9 C
Gondiā
Sunday, June 28, 2026
Home विदर्भ बहुजन समाजाच्या उत्कर्षांसाठी विद्या हेचं सर्वश्रेष्ठ धन-नरेंद्र मेश्राम यांचे प्रतिपादन

बहुजन समाजाच्या उत्कर्षांसाठी विद्या हेचं सर्वश्रेष्ठ धन-नरेंद्र मेश्राम यांचे प्रतिपादन

0
27

छ.शाहू महाराज जयंती उत्साहात.;गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
गोंदिया ता. 27 :- बहुजन समाजाच्या उत्कर्षांसाठी विद्या हेच सर्वश्रेष्ठ धन आहे, कारण अविद्याने समाजावर मोठं अनर्थ घडतं. त्यामुळेचं
महात्मा फुले आणि छत्रपती शाहू महाराजांचे शैक्षणिक धोरण अंगीकार करुण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजासाठी शिक्षणाची संवैधानिक व्यवस्था करुण दिली.अशी ग्वाही स्टडी पॉईंट चे संचालक नरेंद्र मेश्राम यांनी (ता. 26) दिली.
छोटा गोंदिया येथील बोधिसत्व बुद्ध विहारात आयोजित छत्रपती शाहू महाराज यांच्या 152 व्या जयंती निमित्त ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्व. जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अरविंद भावे हे होते. मंचावर सामाजिक कार्यकर्ते संतोष श्यामकुवर, ऍड. एकता गणवीर, पृथ्वीराज कोल्हटकर, अंकुर गजभिये उपस्थित होते.
श्री मेश्राम पुढे म्हणाले की, सरकारने मुख्यमंत्री लाडली बहीण योजना खुशाल राबवावी परंतु अनुसूचित जातीच्या वाट्याला आलेला निधी यासाठी खर्च करू नये, असा सल्ला त्यांनी दिला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अरविंद भावे म्हणाले की,उच्च शिक्षणात विद्यार्थ्यांना मनासारखा प्रवेश मिळण्यासाठी आतापासूनच तय्यारीला लागा. ऍड. गणवीर म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी संविधानाचा आवर्जून अभ्यास करावे. आमच्या महापुरुषांनी आमच्यासाठी अख्खा जीवन समर्पित केला, तुम्हीही भविष्यात समाजासाठी वेळ, पैसा आणि बुद्धिमत्ता प्रदान करावी अश्या त्या म्हणाल्या.
संतोष श्यामकुवर यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की,विद्यार्थ्यानो जीवनात प्रयत्नशिल राहून प्रज्ञावंत व्हा गुणवंत व्हा, पुढारलेल्या वर्गाशी स्पर्धा करुण मोक्याच्या नोकऱ्यांवर कब्जा करुण आय. ए. एस. व्हा असे ते म्हणाले. याप्रसंगी पृथ्वीराज कोल्हटकर यांनीही मार्गदर्शन केले.या प्रसंगी इयत्ता 10 वि आणि 12 वि च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिल्ड आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये खुशी सुखदेवे, पूजा फुलचंद शेलारे, आर्या डहाट,महेक वैद्य, ग्यानीत्री मेश्राम, डिंपल मनोज राऊत, कबीर मेश्राम,सानिध्य संदेश बागडे, श्रेयस सहारे यांचा तर इयत्ता 12 विचे विद्यार्थी श्रावणी शैलेश मेश्राम, अवनी शैलेश मेश्राम, प्रशिल प्रशांत वाहने यांचा समावेश आहे.
हा कार्यक्रम संविधान महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते सुशील गणवीर यांनी अथक परिश्रम घेतले त्यांनी संचालन करुण उपस्थितांचे आभार मानले.यावेळी विद्यार्थ्यांचे पालक आणि मोठ्या संख्याने जनसमुदाय उपस्थित होता.