गोंदिया: दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्वीकार स्पेशल एज्युकेशन सेंटर फॉर एम.आर. चिल्ड्रेन,स्कूल गोंदिया या संस्थेला शैक्षणिक सत्र २०२५-२६ मध्ये ‘दिशा अंमलबजावणी शाळा’ (Disha Implementing School) हा मानाचा पुरस्कार व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.
नागपूर विभागांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात संस्थेच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, भावनिक व कौशल्य विकासासाठी संस्थेने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा गौरव प्राप्त झाला आहे.स्वीकार स्पेशल एज्युकेशन सेंटर ही संस्था दिव्याग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी समर्पित असून, प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमताविकासावर विशेष भर देते. शाळेमध्ये शिक्षणासोबतच थेरपी, कौशल्य प्रशिक्षण, समुपदेशन, पालक मार्गदर्शन आणि विविध उपक्रमांचे प्रभावीपणे आयोजन करण्यात येते.
या यशाबद्दल संस्थेचे संचालक, मुख्याध्यापक, मानसशास्त्रज्ञ, शिक्षकवृंद, कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. हा पुरस्कार संस्थेच्या कार्याला नवी प्रेरणा देणारा असून, भविष्यातही दिव्यांग विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी संस्था कटिबद्ध राहील, असा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.या प्रसंगी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू. हा सन्मान आमच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचे आणि पालकांच्या सहकार्याचे फलित आहे





