25.2 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ मुल्ला येथे स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात साजरा

मुल्ला येथे स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात साजरा

0
39

मुल्ला येथे सरपंच कल्पना बागडे यांचे हस्ते ध्वजारोहन

देवरी, दि.१५ – भारतीय स्वातंत्र्याचा ८०वा सोहळा मोठ्या उत्साहात देशभर साजरा करण्यात आला. दरम्यान, देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मुल्ला येथे गावच्या प्रथम नागरिक सरपंच कल्पना मुकुंदराव बागडे यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

भारतीय स्वातंत्र्याचा सोहळा देशभर साजरा होत असताना देवरी तालुक्यातही हा स्वातंत्र्योत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पोलिस प्रशासन, महसूल विभाग, एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय, शाळा ,महाविद्यालये, नगरपंचायत यासह सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांच्या प्रभात फेऱ्या काढून देण्यात आलेल्या घोषणांनी देवरीचे आसमंत दणाणून गेले होते. यावेळी सर्व गणमान्य मंडळी, राजकीय नेते, पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह शालेय विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने या दिमाखदार सोहळ्याचे साक्षीदार म्हणून उपस्थित होते.

 

blankदरम्यान, मुल्ला ग्रामपंचायतीमध्ये आयोजित या सोहळ्याप्रसंगी सरपंच कल्पना बागडे, सदस्य राजकुमार कुथीर, जगतराम कुरसुंगे,मुकेश राऊत, यशवंत नागदेवे, सावित्री धुर्वे, वैशाली भेंडारकर, संगीता नागोसे, आशा मुनेश्वर, सौ. मरस्कोल्हे, पोलिस पाटील ललिता भुते,सर्व आजीमाजी पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर,माजी सैनिक आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, ‘मेरी माटी, मेरा देश’ या अंतर्गत मुल्ला येथे माजी सैनिक गुरूलाल मेश्राम यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्ला येथेील ध्वजारोहण जि.प सदस्य सविता पुराम यांचे हस्ते पार पडले. यावेळी सरपंच कल्पना बागडे, वैद्यकीय अधिकीरा डॉ. रामकृष्ण येरणे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ कटरे, देवदास नान्हे, पुनाराम नेताम आदी मान्यवर उपस्थित होते.