31.2 C
Gondiā
Tuesday, June 30, 2026
Home विदर्भ पोलिओ लस ही बालकास रोगाविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारक शक्ती निर्माण करते-जि.प.अध्यक्ष भेंडारकर

पोलिओ लस ही बालकास रोगाविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारक शक्ती निर्माण करते-जि.प.अध्यक्ष भेंडारकर

0
30

प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना बाक्टी व अंगणवाडी ईंजोरी येथे पोलिओ बुथवर पोहचुन पोलियोचे डोज पाजुन बुथाचे केले उदघाटन

अर्जुनी मोरगाव- जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेच्या अनुशंगाने “पोलिओ रविवार”रोजी जिल्ह्यात सर्वत्र 0 ते 5 वर्षाच्या आतील बालकांना दोन डोज पोलिओचे पाजण्यात आले.जिल्ह्यात आरोग्य प्रशासनामार्फत सर्वत्र जिल्हा रुग्णालये,उपजिल्हा रुग्णालये,ग्रामीण रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्र,आरोग्य वर्धीनी उपकेंदे,अंगणवाडी,ग्रामपंचायती,रेल्वे स्टेशन,बस स्टॉप,सार्वजनिक ठिकाणे,विटा भट्टी असे विविध ठिकाणातुन बुथाचे आयोजन करुन बालकांना पोलिओचे डोज पाजण्यात आले.जिल्ह्यात सर्वत्र अधिकारी,पदाधिकारी,जिल्हा परिषद सदस्य. पंचायत सदस्य,सरपंच यांचे हस्ते बालकांना डोज पाजुन शुभारंभ करण्यात आला.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना बाक्टी येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तेथील लसीकरण बुथावर एका लहान बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्यानंतर लागलीच अंगणवाडी ईंजोरी येथील बुथावर भेट देवुन बालकास पोलिओचे दोन डोज मोहिमेची सुरुवात केले.

दि.28 जुन रोजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना बाक्टी व अंगणवाडी ईंजोरी येथे सकाळी आठ वाजताच पोलिओ बुथवर पोहचुन पोलियोचे डोज पाजुन बुथाचे उदघाटन केले सोबतच लोकांना पोलिओ लसीकरणाचे महत्व पटवुन दिले.लसीकरण हे बालमृत्यू व कुपोषण रोखण्यासाठी प्रभावी साधन आहे.सर्व आजारांवर लढण्यासाठी बाळाला जन्मापासूनच वेगवेगळ्या वयोगटात लसीकरण दिल्यास रोगाविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारक शक्ती निर्माण होते.लोकांनी जबाबदारीने आपले बालकांचे संपुर्ण लसीकरण शासकिय रुग़्णालयात करुन आपल्या बालकास कुपोषण व गंभीर आजाराविरुद्ध लढण्यासाठी लागणारे प्रतिकार शक्ती निर्माण करावे. पोलिओ लसीकरण हे बालकास संरक्षक कवच कुंडले प्रदान करण्यात असतात.नागरिकांनी मनात कुठलीही शंका न बाळगता बालकास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावुन मोफत लसीकरण करुन घेण्याचे आवाहन यावेळेस केले.

पोलिओमुक्त समाज घडविण्यासाठी प्रत्येक बालकांना आरोग्य संरक्षणासाठी पालकांनी जबाबदारीने पल्स पोलिओ लसीकरण केंद्रावर आपल्या बालकास घेवुन जाण्याचे कळकळीचे आवाह्न केले.

प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना बाक्टी येथे त्यावेळेस वैद्यकीय अधिकारी डॉ.श्वेता कुलकर्णी, डॉ.कुंदन कुलसुंगे,समुदाय आरोग्य अधिकारी आरती काळे तसेच अंगणवाडी ईंजोरी येथे आशा सेविका वनिता मरस्कोल्हे,अंगणवाडी सेविका वैद्य उपस्थित होते.