28.1 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home राजकीय भाकपची मोहीम;जनतेच्या द्वारी संवाद घरोघरी

भाकपची मोहीम;जनतेच्या द्वारी संवाद घरोघरी

0
57

गोंदिया-भारतीय कम्युनिस्ट पार्टी गोदियाच्या वतीने सोमवार (दि. 29 जून) ला या काळात पक्षाची भूमिका व केंद्र सरकारची जनविरोधी, कष्टकरी वर्गा विरोधी भूमिका व स्वातंत्र्य पूर्वी, स्वातंत्र्या नंतरच्या काळात पक्षाने केलेल्या कामगिरीला, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत पक्षाची महत्वाची भूमिका जनते पर्यंत पोहचवन्या साठी “जनतेच्या द्वारी संवाद घरोघरी” मोहिमे अंतर्गत आंभोरा शाखे तर्फे पक्षाचे जिल्हा कोषाध्यक्ष व आयटक चे जिल्हसचिव काॅ रामचंद्र पाटील, काॅ प्रल्हाद उके, (तालुका सचिव )काॅ जितेंद्र गजभिये (जिल्हा कौन्सिल सदस्य) यांच्या नेतृत्वात मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत विमला रामटेके, बेनुबाई नेवारे, सविता सोनटक्के, नरेंद्र सोनटक्के, नितुबाई सोनटक्के, शेवंता पारधी, बालकास गणवीर, मुरली रामटेके, देवका पटले व इतर कार्यकर्त्यांच्या जथ्याने पक्षाचे परिपत्रकाचे वाटप करण्यात आले आले. यावेळी झालेल्या सभेत कॉ. रामचंद्र पाटील, कॉ. प्रल्हाद उके, कॉ. जितेंद्र गजभिये यांनी मार्गदर्शन केले.