गोरेगाव,दि.०२ः पंचायत समिती गोरेगावच्या सभागृहात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त पंचायत समिती गोरेगावच्या वतीने उत्कृष्ट शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती चित्रकला चौधऱी या होत्या.यावेळी उपसभापती रामेश्वर महारवाडे तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी उपसभापती रामेश्वर महारवाडे यांनी शेतकरी बांधवांना शुभेच्छा देत आधुनिक शेती, जलसंधारण, सेंद्रिय शेती, नवीन कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब आणि शाश्वत शेतीचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शेतकरी हा आपल्या देशाचा अन्नदाता असून त्याच्या कष्टामुळे समाजाची प्रगती व समृद्धी शक्य होते. प्रत्येक शेतकऱ्याने नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शेती अधिक उत्पादनक्षम व फायदेशीर करण्याचा संकल्प करावा, असा संदेश दिला.कार्यक्रमात उत्कृष्ठ शेतकरी यांचा सत्कार करण्यात आला.





