देवरी,दि. ४ जुलै-देवरी शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर गोवंश कत्तल व मांसविक्रीच्या अड्यावर स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), गोंदिया यांच्या पथकांने शनितारी पहाटे धडक छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत १४०.५ किलो संशयित गोवंश मांस, कत्तलीसाठी वापरण्यात आलेले साहित्य असा एकूण ३७,७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन सख्ख्या भावांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. ४ जुलै) पहाटे सुमारे ५.३० वाजता देवरीतील प्रभाग क्रमांक ७मध्ये बेकायदेशीर गोवंश कत्तल सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर नुकतेच रूजू झालेले पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगंनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी चापथकाने तातडीने घटनास्थळी छापा टाकला.
कारवाईदरम्यान दोन गोवंश जनावरांची कत्तल करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून घटनास्थळावरून ९४०.५ किलो संशथित गोवंश मांस तसेच कत्तलीसाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी घटनास्थळी आदळलेल्या दोन सख्ख्या भावांना ताव्यात घेऊन अटक करण्यात आली.





