
नागपूर/चंद्रपूर दि. 17 : राज्य उत्पादन शुल्क विभागाने वरोरा परिसरातील
माढेळी पवनी रोडवर सापळा रचून केलेल्या कार्यवाहीत देशी दारुच्या 26
पेट्या जप्त केल्या. तसेच अवैध दारुची वाहतूक करणारे दोन जीप व एक दुचाकी
वाहन जप्त केले. जप्त केलेल्या अवैध दारुची किंमत 5 लक्ष 14 हजार 800
रुपये आहे.
उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय आयुक्त श्रीमती उषा वर्मा यांच्या
मार्गदर्शनाखाली चंद्रपूरचे अधीक्षक पराग नवलकर व भरारी पथकाचे प्रमुख
सुनिल गुजर यांनी ही दारु जप्त केली आहे. दारुची अवैध वाहतूक करणाऱ्या
चार आरोपीना अटक करण्यात आली आहे.
भरारी पथकाद्वारे अवैध दारुविरुद्ध विशेष मोहिम सुरु असून चंद्रपूर व
वरोरा पथकातर्फे देशी दारुच्या 26 पेट्या जप्त करण्यात आल्या आहेत. अवैध
दारु जप्त करण्याची कारवाई निरीक्षक सुनील गुजर, उपनिरीक्षक पी.ए.मुळे,
वाय.एस.व्हनमारे तसेच चेतन अवचट, जगदीश कापटे, जगदीश मस्के, किशोर
पेदुजवार, जगन पठ्ठलवार आदीनी यशस्वी सापळा रचून कारवाई केली.