28.3 C
Gondiā
Monday, July 6, 2026
Home विदर्भ एक पेड मा के नाम अंतर्गत पर्यावरण रक्षणाचा शिक्षक पतसंस्थेचा हरित संकल्प

एक पेड मा के नाम अंतर्गत पर्यावरण रक्षणाचा शिक्षक पतसंस्थेचा हरित संकल्प

0
12

गोंदिया : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत “एक पेड मा के नाम” या उपक्रमांतर्गत गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था, गोंदिया यांच्या वतीने पोलीस मुख्यालय कार्यालय गोंदिया येथे वृक्षारोपण कार्यक्रम सुनील बलभीम दर्रेकर पोलीस उपअधीक्षक यांच्या शुभ हस्ते, किशोर डोंगरवार अध्यक्ष गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था, भारती तिडके संचालिका, ज्योतीप्रकाश गजभिये प्रधान व्यवस्थापक, राज वैद्य पोलीस हवालदार यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला.

पर्यावरणाचे संरक्षण ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असून, प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असा संदेश यावेळी देण्यात आला. “आईच्या नावाने एक वृक्ष” लावून मातृऋणाची कृतज्ञतेने आठवण ठेवत पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देण्याचे आवाहनही करण्यात आले.
या उपक्रमात पतसंस्थेचे अशोक बिसेन उपाध्यक्ष, गौतम बांते शाखाध्यक्ष, विनोद बडोले शाखाध्यक्ष, शोभेलाल ठाकूर शाखाध्यक्ष, संदीप तिडके, राजेंद्र बोपचे, उमेश रहांगडाले, दिलीप लोदि, सतीश दमाहे, राजेश रामटेके, कु. नीतू डहाट संचालक मंडळाचे सदस्य, तसेच कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली. लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन करण्याची जबाबदारीही सहभागी सदस्यांनी स्वीकारली.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण ही केवळ औपचारिकता न राहता ती लोकचळवळ बनावी, असे मत व्यक्त केले. पर्यावरण संवर्धनाबाबत समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येईल, अशी माहिती आयोजकांनी दिली.सदर कार्यक्म यशस्वी करण्याकरीता संस्थेचे कर्मचारी पंकज रहांगडाले, सुशील बुरडे, भूमेश्वर हत्तीमारे, घनश्याम न्यायकरे, प्रशांत भगत, कार्तिक चौधरी, चीतेश कोल्हे, संगम राहुल, सुमित खोटेले, दिनेश गोस्वामी यांनी अथक परिश्रम घेतले.
कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

“वृक्षारोपण हीच भावी पिढीप्रती खरी सामाजिक जबाबदारी” _किशोर डोंगरवार

“पर्यावरणाचे रक्षण ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. ‘एक पेड माँ के नाम च्या नावाने’ हा उपक्रम केवळ वृक्षारोपणाचा नसून, मातृप्रेम, कृतज्ञता आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम आहे. प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला, तर हरित, समृद्ध आणि निरोगी समाज घडविण्यास मोठी मदत होईल. गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सामाजिक बांधिलकी जपत अशा पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर राहील.” असा विश्वास गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष किशोर डोंगरवार यांनी व्यक्त केला.