गोंदिया- जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून अनेक ग्रामीण रस्त्यांवर पूरस्थिती निर्माण झाली आहे. नद्या-नाले दुथडी भरून वाहत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि काही गावांचा संपर्क तुटला आहे.जिल्ह्यात २८ मीमी पावसाची नोंंद झाली असून कटटीपार,सालेकसा,आमगाव ,गंगाझरी, कावराबंाध मडंळात अतिवृष्टी नोंदवली गेली आहे. गोंदिया शहरातील व ग्रामीण भागातील अनेक सखल वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.पांगोली नदीला पूर आला असून वाघनदी व वैनगंगा नद्यांच्या वाढत्या जलपातळीत वाढ झालेला आहे.बबई-कमरगांव मार्ग आणि देवरी-चिचगड मार्ग पुरामुळे काही काळासाठी बंद करण्यात आले होते.तर आज गोंदिया तालुक्यातील दासगाव काटी मार्गावरील नाल्यावरील कच्चा पुल वाहून गेल्याने संपर्क तुटला आहे.सततच्या पावसामुळे धापेवाडा धरण,पुजारीटोला धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.तर गोरेगाव तालुक्यातील सोनी येथे सततधार पावसामुळे घर कोसळल्याची माहिती आपती निवारण अधिकारी राजन चौबे यांनी दिली आहे.





