26.8 C
Gondiā
Tuesday, July 7, 2026
Home रोजगार/व्यापार AOP गोठणगाव येथे निःशुल्क पोलिस भरती पूर्व प्रशिक्षणास सुरुवात !

AOP गोठणगाव येथे निःशुल्क पोलिस भरती पूर्व प्रशिक्षणास सुरुवात !

0
7

गोंदिया,दि.०७ः जिल्हा पोलीसाच्या दादालोरा एक खिडकी योजनेअंतर्गत पोलीस अधीक्षक गोरख भामरे,अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांचे संकल्पनेतून आदिवासी व दुर्गम भागामध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी एओपी गोठणगाव येथे प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. सदरचे प्रशिक्षण सर्वांसाठी मोफत असल्याने परिसरातील गरजू विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन AOP प्रभारी पोलीस उपनिरीक्षक निळकंठ गित्ते यांनी केले आहे. मागील वर्षी एओपी गोठणगाव येथे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकूण 10 विद्यार्थ्यांची शासनाच्या विविध विभागामध्ये निवड झाली आहे. त्यामध्ये संध्या ईश्वार (लातूर पोलिस),अरमान राणे (कोल्हापूर पोलिस),अभय लाडे (मीरा भाईंदर पोलिस),चंद्रशेखर मेश्राम(एम. एस. एफ.),अंकित जांभूळकर (भंडारा पोलिस),दिवाकर उरकुडे (नागपूर पोलिस),निलेश आळे (एस.आर.पी.एफ. चंद्रपूर),मिलिंद उके (अग्निवीर),ब्रिजेश रामटेके (आरोग्य विभाग)व महिमा कुंभारे (मुंबई पोलिस) असे गुणवंत विद्यार्थी आहेत.
सध्या चालू असलेल्या प्रशिक्षणामध्ये पोलिस भरती पूर्व अंतर वर्ग प्रशिक्षण व सराव पेपर घेऊन लेखी परीक्षेची तयारी पोउपनि निळकंठ गित्ते व पोलीस शिपाई अभिजित इटेकर हे करुन घेतात.तर पोलिस हवालदार सचिन घरोटे हे बाह्य वर्ग प्रशिक्षण देऊन मैदानी परीक्षेचा सराव करुन घेतात. सदर प्रशिक्षणाचा बेरोजगार युवक- युवतींना लाभ होत असून परिसरातील नागरिकांकडून रोजगाराभिमुख उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.