पुणे/वृत्तसेवा-पोलिसांकडून 4 पर्यटकांचे अपहरण करून 5 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघउकीस आला आहे. या प्रकरणात 6 जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात हे प्रकरण घडले आहे.या प्रकरणात आरोपींची नजर चुकवून एका तरुणाने आपल्या मनगटावरील स्मार्ट वॉचचा वापर करून इमर्जन्सी अलर्ट मेसेज पिंपरी चिंचवड पोलिसांना पाठवला.
हा मेसेज मिळताच पिंपरी-चिंचवड पोलीस यंत्रणांनी धाव घेतली. पुण्यातून लोणावळ्याला फिरण्यासाठी निघालेल्या 4 पर्यटकांचे पोलिसांच्या वर्दीत आलेल्या 6 जणांनी अपहरण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पोलिसांच्या वर्दीतील 6 आरोपींनी 4 पर्यटकांना खोट्या ड्रग्ज केसमध्ये अडकवण्याची धमकी देऊन 5 लाख रुपयांची खंडणी मागितली होती.
आणि या 4 पर्यटकांना 7 तास पकडून ठेवले होते. मात्र, या प्रसंगात एका स्मार्ट वॉचने हे प्रकरण उघड झाले आहे. पीडित तरुणाने आपल्या स्मार्ट वॉचवरून पाठवलेल्या एका इमर्जन्सी अॅलर्ट मेसेजमुळे मुळे अपहरणाचा हा संपूर्ण प्रकार पिंपरी चिंचवड पोलिसांना कळाला आहे. पुणे शहरातील विमाननगर येथील रहिवासी भूषित उमेश हे त्यांचे मित्र मोहम्मद काशान आजमी, त्यांची पत्नी फायजा जमील आणि सय्यद जुबेर अहमद यांच्यासोबत कारने लोणावळ्याला पर्यटनासाठी चालले होते.
पुण्यातील कामशेतजवळ पोलिस वर्दीतील 6 जणांनी या 4 पर्यटकांची कार अडवली. आणि गांजा केसमध्ये अडकवण्याची धमकी देऊन 5 लाख रुपये मागितले. पोलिस वर्दीतील 6 आरोपींकडून या 4 पर्यटकांना पैशांसाठी तळेगाव येथील एटीएम जवळ नेण्यात आले होते. आणि 7 तास पकडून ठेवले होते. या आरोपींची नजर चुकवून एका तरुणाने आपल्या मनगटावरील स्मार्ट वॉचचा वापर करून इमर्जन्सी अलर्ट मेसेज पोलिसांना पाठवला.
हा मेसेज मिळताच पिंपरी-चिंचवड पोलीस यंत्रणांनी तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी लोकेशन ट्रेस केले. आणि पुण्यातील 4 पर्यटकांची आरोपींच्या तावडीतून सुटका केली आहे. या प्रकरणात सुरूवातीला हा गुन्हा एखाद्या सराईत गुन्हेगारी टोळीने केला असावा, असा पुणे पोलिसांचा संशय होता. मात्र, घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पुणे पोलिसांना मोठा धक्का बसला आहे.
पुण्यातील 4 पर्यटकांचे अपहरण करणारे पुणे-मुंबई महामार्ग सुरक्षा पथकातील 3 पोलीस कर्मचारी आणि 3 होमगार्ड असल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. या घटनेवर पुण्यातील नागरिकांनी आणि पर्यटकांनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणात कामशेत पोलिसांकडून 6 आरोपींवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अधिक तपास पुणे पोलिस करत आहेत.




