29.3 C
Gondiā
Thursday, July 9, 2026
Home यशोगाथा दूध संकलन व शीतकरण केंद्र : उमेद योजनेचा यशस्वी नमुना

दूध संकलन व शीतकरण केंद्र : उमेद योजनेचा यशस्वी नमुना

0
25

 गोंदिया, दि.9 : ग्रामीण भागातील दुग्धव्यवसायाला चालना देत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने “दूध संकलन व शीतकरण केंद्र” हा उपक्रम प्रभावी ठरत आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात,  एकता दूध शीतकरण केंद्र, चिलाटी – निसर्ग CLF, सोनी, येथे स्थापन करण्यात आलेले हे केंद्र उमेद (MSRLM) अंतर्गत सक्षमीकरण प्रकल्प सन 2024-25 मध्ये राबविण्यात आले आहे.

         या प्रकल्पासाठी सुमारे 71.28 लाख रुपये खर्च करण्यात आला असून, दररोज 5,000 लिटर दूध शीतकरणाची क्षमता या केंद्रात उपलब्ध आहे. परिसरातील 8 दूध संकलन केंद्रांमार्फत दूध गोळा करून येथे शीतकरण केले जाते. या उपक्रमाचा थेट लाभ सुमारे 2000 कुटुंबांना होत असून, सुमारे 42 किलोमीटरच्या परिसरातील गावांचा समावेश आहे. सध्या दररोज 600 ते 700 लिटर दूध संकलित होत असते.

         या केंद्रामुळे स्थानिक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होत आहे. दूध योग्य तापमानात साठविल्याने त्याची गुणवत्ता टिकून राहते आणि बाजारभाव चांगला मिळतो. परिणामी, पशुपालकांना अंदाजे 2 ते 3 रुपये प्रति लिटर अतिरिक्त दर मिळत असून त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होत आहे.

         दूध संकलन व शीतकरण केंद्रामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला चालना मिळाली असून महिलांच्या स्वयं-सहायता गटांनाही बळकटी मिळत आहे. एकात्मिक प्रयत्नांमुळे हा प्रकल्प यशस्वी ठरला असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारा आदर्श उपक्रम म्हणून तो पुढे येत आहे.