29.7 C
Gondiā
Thursday, July 9, 2026
Home विदर्भ जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन शनिवारी;कुंभारेनगरवासीयांची उड्डाणंपूलाची मागणी

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन शनिवारी;कुंभारेनगरवासीयांची उड्डाणंपूलाची मागणी

0
7

गोंदिया ता. 9 जुलै :– गोंदिया -चंद्रपूर लोहमार्गावरील भीमनगर येथील निर्माणाधीन अंडरपासचे काम बंद करून त्याऐवजी उड्डाण पुलाची मागणीवर तोडगा काढण्यासाठी येत्या शनिवारी दिनांक 11 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11.00 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीदरम्यान खासदार डॉ.प्रशांत पडोळे, स्थानिक जनप्रतिनिधी, नगरसेवक सुनील भरणे, स्नेहा (डॉली) गडपायले, सुनील भालेराव,अजय यादव,पंकज यादव तसेच बी अँड सी विभागाचे अधिकारी आणि रेल्वे विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, चारही बाजूने रेल्वे चौकींच्या वेढ्यात अडकलेल्या कुंभारे नगरावर दुसऱ्यांदा अंडर पासचा सामना करण्याची पाळी आली आहे. हा अंडरपास पुनश्च निर्माण झाल्यास वॉर्ड क्र. 8 चे रहिवासी ज्यामध्य कुंभारेनगर, सिग्नल टोली भीमनगर, सवित्रीबाई फुले वॉर्ड, लक्ष्मीनगर यांचे जीवन विस्कळीत होणार असून याबरोबरच तिरोडा, मुंडीपार, ढाकणी कडून येणाऱ्या अश्या 15 हजार जनतेला याचा जोरदार फटका बसणार आहे.यासाठी अंडर पास ऐवजी उड्डाणंपूलाची मागणी घेऊन मागील 6 जुलै रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं.यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांच्यासह नगरसेवक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्याने उपस्थित होते.या निवेदनाच्या पार्श्वभूमिवर आता शासनाने नमते धोरण घेतले असून यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करुण निर्णय घेण्यात येणार आहे.
दरम्यान रेल्वे विभागाचे अधिकारी आणि स्थानिक जनप्रतिनिधी व नगरवासी यांच्या उपस्थितीत मोका चौकशी करण्यात येऊन उड्डाणं पूल बांधकाम करण्यासाठी पर्यायी जागेचा सर्वे करण्यात येऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.मागील 6 जुलै रोजी दिलेल्या निवेदनावर चर्चा करताना, सध्या सुरु असलेले गोंदिया -चंद्रपूर रेल्वेमार्गावरील अंडरपास चे खोदकाम थांबविण्यात येईल आणि रेल्वेमार्गाला धोका  उदभवू नये यासाठी डागडुजीचे काम सुरु राहील असे आश्वासन जिल्हाधिकारी श्री पत्की यांनी दिले.