26.4 C
Gondiā
Saturday, July 11, 2026
Home गुन्हेवार्ता पॅथालॉजी लॅबला ३४ लाखांचा चुना;दोन महिला कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल !

पॅथालॉजी लॅबला ३४ लाखांचा चुना;दोन महिला कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल !

0
16

गोंदिया – गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नामांकित पॅथॉलॉजी लॅबमध्ये विश्वासाला तडा देऊन लाखो रुपयांची अफरातफर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लॅबमध्ये काम करणाऱ्या दोन महिला रिसेप्शनिस्ट आणि एका सॅम्पल कलेक्शन करणाऱ्या कर्मचाऱ्याने आपसात संगनमत करून लॅबच्या बैंक खात्यात रक्कम जमा न करता चक्क ३४ लाख ४१ हजार ०१४ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी महिला डॉक्टरच्या लक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी तीनही आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला
आहे.
सविस्तर असे की, नागपूर येथील रहिवासी डॉ. मनिषा विवेक मिश्रा (५८) यांची गोंदिया येथील अंसारी वार्डात पॅथॉलॉजी लॅब आहे. या लॅबमध्ये आरोपी प्रिया निलेश्वर गिन्हेपुंजे (२५) रा. विजयनगर, भगतसिंग वार्ड, गोंदिया आणि आरोपी स्वाती संतोष चौधरी (२२) रा. भजेपार, ता. आमगाव या दोन्ही कॅश काउंटरवर रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरीला होत्या, तर आरोपी ललीत तालीकराम साठवणे (३२) रा. चांदणीटोला हा रुग्णांचे सॅम्पल गोळा करण्याचे काम पाहत होता. एप्रिल २०२५ ते मे २०२६ या वर्षभराच्या कालावधीत या तीनही आरोपींनी संगनमत करून लॅबच्या हिशोबात मोठी तफावत आढळल्यानंतर डॉ. मनिषा मिश्रा यांनी अंतर्गत तपासणी केली असता हा कोट्यवधींचा घोळ समोर
आला. त्यानंतर त्यांनी तात्काळ गोंदिया शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली. प्राथमिक चौकशीत आरोपींनी विश्वासाने सोपवलेल्या रकमेचा अपहार करून खोटे दस्ताऐवजतयार केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी गोंदिया शहर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बोरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक केदार घाडगे करीत आहेत.