‘आय एम विनर’ व ‘विनर ऑफ द इयर’ राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेचा जिल्हास्तरीय गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
गोंदिया, दि. १६ जुलै : विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी, आत्मविश्वास वाढावा आणि भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम पायाभरणी व्हावी या उद्देशाने ध्येय एज्युकेशन फाउंडेशन व ध्येय प्रकाश अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आय एम विनर’ व ‘विनर ऑफ द इयर’ राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय गुणगौरव सोहळा दि. १२ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुरुनानक ऑडिटोरियम येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले गोंदिया जिल्हा परिषदेचे माध्यमिक उपशिक्षणाधिकारी गजानन मंदाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, सातत्याने अभ्यास करून स्पर्धा परीक्षांची तयारी करावी आणि जीवनात यश संपादन करावे,” असे प्रेरणादायी आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले एन. जी. डहाके (शिक्षण विस्तार अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया) यांनी देखील विद्यार्थ्यांना “स्पर्धा परीक्षा जीवनात अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावतात व आपले भविष्य घडवतात त्याकरिता लहानपणापासून अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देत रहा” असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ध्येय एज्युकेशन फाउंडेशनचे जिल्हाप्रमुख वशिष्ठ खोब्रागडे यांनी केले. त्यांनी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. यावर्षी गोंदिया जिल्ह्यातील सुमारे २,००० विद्यार्थ्यांनी या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत सहभाग घेतला असून त्यापैकी ५०० हून अधिक विद्यार्थी जिल्हास्तर, तालुकास्तर व केंद्रस्तरावर गुणवंत ठरले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या विभागीय स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती मिळविलेल्या हितेश रहांगडाले यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. तसेच महेंद्र टेम्भूर्णीकर, प्रितम टेम्भरे आणि उत्तम टेम्भरे यांच्या वतीने त्यांच्या कुटुंबीयांनी सन्मानचिन्ह स्वीकारले. शासनाचे एसआयआरचे कार्य असल्याने इतर केंद्रप्रमुख कार्यक्रमाला पोहचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचे सन्मानचिन्ह लवकरच एखाद्या कार्यक्रमात त्यांना देवून सन्मान केले जाईल असे जिल्हाप्रमुख वशिष्ठ खोब्रागडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाला एम. एल. मेश्राम (शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती गोंदिया), श्रीमती निशा बोदेले (केंद्रप्रमुख, रावणवाडी), यशवंत भगत (उच्च श्रेणी मुख्याध्यापक, तुमखेडा), संदीप तिडके (जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक समिती, गोंदिया), गोपाल झंझाळ (जिल्हा प्रतिनिधी, ध्येय एज्युकेशन फाउंडेशन, भंडारा), आर. एस. ताजने (सेवानिवृत्त मुख्याध्यापक), श्रीमती सविता बेदरकर (समाजसेविका), प्रमोद गूडधे (अध्यक्ष, युवापर्व सामाजिक संस्था) आणि विरेंद्र बिसेन (शिक्षक, विवेक मंदिर स्कूल, गोंदिया) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन आदर्श शिक्षक दिनेश अंबादे व शिक्षिका स्नेहा रामटेके यांनी केले, तर धनराज भगत यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ध्येय एज्युकेशन फाउंडेशनच्या मिनल टेम्भरे (गोंदिया तालुका प्रतिनिधी), धनराज भगत (आमगाव तालुका प्रतिनिधी), अनिल वैद्य (सडक अर्जुनी तालुका प्रतिनिधी), राजकुमार बागडे(तिरोडा), जितेंद्र काशिवार(स /अर्जुनी), मंगेश बोरकर(गोरेगाव), सुशील भांडारकर(गोंदिया), देवेंद्र बागडे(आमगाव), सारिका श्रीवास्तव(आमगाव), शुभांगी चौधरी(तिरोडा ), वैशाली पेटकर, योगिता बुरडकर, सुनिता खोब्रागडे, सीमा लिल्हारे, भावना दमाहे, श्रावणी टेम्भरे, संभवी खोब्रागडे (गोंदिया), तसेच विषय साधनव्यक्ती सुनील बापचे(गोरेगाव) यांनी विशेष परिश्रम घेतले.
यांचा झाला राज्यस्तर गुणवंत विद्यार्थी म्हणून सत्कार :- श्रावणी संजय टेम्भरे (इयत्ता १० वी, शारदा कॉन्व्हेंट), स्व. निराली मनिष चापले (इयत्ता ५ वी, PMShRI राणी अवंतिबाई न. प. प्रा. शा. तिरोडा ), पूर्वार्ध वशिष्ठ खोब्रागडे व लक्ष हुमेंद्रकुमार खोटेले (इयत्ता ७ वी, इंदिराबेन हरिहरभाई पटेल प्रा. शा. कुडवा), तसेच एकूण १५० जिल्हास्तरीय व गोंदिया तालुकास्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचेही सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आले.




