22.8 C
Gondiā
Saturday, September 5, 2026
Home शैक्षणिक एमएस-सीआयटी परीक्षेत जतिन उकेला मिळाले १०० पैकी १०० गुण; सुरभी कॉम्प्युटर एज्युकेशनचे...

एमएस-सीआयटी परीक्षेत जतिन उकेला मिळाले १०० पैकी १०० गुण; सुरभी कॉम्प्युटर एज्युकेशनचे नाव उज्ज्वल

0
91

गोंदिया/एकोडी (प्रतिनिधी) : सुरभी कॉम्प्युटर एज्युकेशन, एकोडी येथील विद्यार्थी जतिन प्रल्हाद उके (रा. किंडगीपार) यांनी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) आयोजित एमएस-सीआयटी (MS-CIT) परीक्षेत १०० पैकी १०० गुण मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले आहे.जतिनच्या या उज्ज्वल यशामुळे सुरभी कॉम्प्युटर एज्युकेशन, एकोडी, त्यांच्या पालकांचे तसेच किंडगीपार गावाचे नाव गौरवान्वित झाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
यावेळी संस्था संचालक रविकुमार पटले, संस्था संचालिका तथा जिल्हा परिषद सदस्या सौ. अश्विनी रविकुमार पटले, शिक्षक अतुल बिसेन, शिक्षिका ईशरत पठाण, अफ्रिन तेले तसेच जतिनचे वडील  प्रल्हाद उके उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जतिनचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील शैक्षणिक तसेच व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी उपस्थितांनी जतिनच्या अथक परिश्रम, जिद्द आणि गुणवत्तेचे कौतुक करत इतर विद्यार्थ्यांनीही त्यांचा आदर्श घेऊन उत्कृष्ट यश संपादन करावे, असे मत व्यक्त केले.