24.8 C
Gondiā
Tuesday, July 21, 2026
Home विदर्भ शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर रानडुकराचा हल्ला; शेतकरी जखमी

शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर रानडुकराचा हल्ला; शेतकरी जखमी

0
4

चित्रा कापसे/तिरोडा–तालुक्यातील धादरी येथे सोमवारी (दि. 20 जुलै 2026) दुपारी सुमारे 2.45 वाजताच्या सुमारास शेतात खरीप पिकाच्या कामात व्यस्त असलेल्या एका शेतकऱ्यावर रानडुकराने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला.
जखमी शेतकऱ्याचे नाव रामकृष्ण आबाजी कापसे, वय 67 वर्षे रा. धादरी ता. तिरोडा, जि. गोंदिया असे आहे. हल्ल्यानंतर कुटुंबीय व ग्रामस्थांनी त्यांना तातडीने तिरोडा येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांच्या शरीरावर खोल जखमा झाल्या असून त्यांना तीन ते चार टाके घालण्यात आले आहेत.
या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात काम करताना वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा धोका वाढत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. ग्रामस्थांनी वन विभागाने रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवावर तातडीने नियंत्रण आणावे, तसेच शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना करून अशा घटना पुन्हा घडू नयेत, अशी मागणी केली आहे.

blank