28.3 C
Gondiā
Monday, July 27, 2026
Home विदर्भ सालेकसा येथे स्वच्छता अभियान उत्साहात

सालेकसा येथे स्वच्छता अभियान उत्साहात

0
7

सालेकसा : सालेकसा येथे २३ जुलै रोजी भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आले. नगर पंचायत सालेकसाच्या विद्यमाने राबवलेल्या या अभियानात लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून बसस्थानक परिसर, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर तसेच महात्मा गांधी स्मारक परिसराची स्वच्छता करत नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला.
सदर कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ. अजय उमाटे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. या स्वच्छता अभियानात नगर पंचायतीच्या स्वच्छता, पाणीपुरवठा व आरोग्य सभापती छन्नुताई शिवणकर, नगरसेवक डॉ. राजेंद्र बडोले, जिल्हा महासचिव डॉ. हिरालाल साठवने, शहराध्यक्ष ब्रजभूषण बैस, तालुका युवक अध्यक्ष बाजीराव तरोने, महिला शहराध्यक्ष सुनिता थेर, तालुका युवती अध्यक्षा सुषमाताई राऊत, उषाताई व्हरहाडे, राहुल जंगेरे, रिषी बैस,दिवाकर सोनवाने, उद्योजक अनिल अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते विष्णू वशिष्ठ, नरेश अग्रवाल, भास्कर शिवणकर, नंदकिशोर शाह यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते व नगर पंचायतीचे स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

blank