24.1 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ शिक्षण सचिव देओल यांची पीएमश्री जि. प. भारतीय विद्यालयाला भेट !

शिक्षण सचिव देओल यांची पीएमश्री जि. प. भारतीय विद्यालयाला भेट !

0
2

एकोडी : महाराष्ट्र राज्याचे शिक्षण सचिव माननीय रणजितसिंह देओल यांनी १४ ऑगस्ट रोजी ‘पीएम श्री’ जिल्हा परिषद भारतीय विद्यालय एकोडी (दांडेगाव) या शाळेला सदिच्छा भेट देऊन शैक्षणिक व भौतिक उपक्रमांची पाहणी केली. या उच्चस्तरीय भेटीदरम्यान जिल्हाधिकारी मंदार पत्की, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी झेनिथ चंद्र दोन्तुला, ‘डायट’ चेप्राचार्य हिवारे, माध्यमिक शिक्षणाधिकारी महामुनी, प्राथमिक शिक्षणाधिकारी खंदारे यांच्यासह शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शाळेत आगमन होताच प्राचार्य एम. एच. पटले, टी. बी. बावनकुळे आणि प्रमोद पटले यांनी शाळेमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी शिक्षण सचिवांनी पीएम श्री योजनेअंतर्गत शाळा कशी अधिक तंत्रस्नेही, गुणवत्तापूर्ण आणि समृद्ध’ आदर्श शाळा’ म्हणून विकसित करता येईल, यावर मार्गदर्शन केले.
शिक्षण सचिवांनी शाळेतील अद्ययावत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र प्रयोगशाळांची पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष विज्ञान प्रयोग करून दाखवले. विशेषतः भौतिकशास्त्राच्या ‘इलेक्ट्रिक सर्किट’ प्रयोगाचे एका विद्यार्थ्याने केलेले अभ्यासपूर्ण व प्रभावी सादरीकरण ऐकून शिक्षण सचिव रणजितसिंह देओल यांनी विद्यार्थ्याला शाबासकी दिली. तिन्ही विज्ञान शाखांमधील विद्यार्थ्यांशी त्यांनी थेट संवाद साधून प्रश्न विचारले असता विद्यार्थ्यांनी दिलेला उत्स्फूर्त व आत्मविश्वासपूर्ण प्रतिसाद पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी शाळा समितीच्या अध्यक्षा सौ. अश्विनीताई पटले, उपाध्यक्ष अजबराव रिनायत, गटशिक्षणाधिकारी मेश्राम, केंद्र समन्वयक नरेंद्र गौतम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजय अंबुले, उपाध्यक्ष मयुरी मेश्राम यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.