24.9 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home शैक्षणिक मा.खासदार बोपचे यांच्या वाढदिवसानिमित्त परशुराम विद्यालयात ‘PVM Students Bank’ या अभिनव योजनेचा...

मा.खासदार बोपचे यांच्या वाढदिवसानिमित्त परशुराम विद्यालयात ‘PVM Students Bank’ या अभिनव योजनेचा शुभारंभ!

0
11

श्री खुशालचंद्रजी बोपचे यांच्या वाढदिवसानिमित्त परशुराम विद्यालयात विविध उपक्रम उत्साहात संपन्न 

गोरेगाव,दि.१७ ऑगस्ट २०२६:तालुक्यातील परशुराम शिक्षण प्रसारक संस्था, गोरेगावचे सचिव तथा माजी खासदार डाॅ.खुशालचंद्र बोपचे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून परशुराम विद्यालय, मोहगाव बु. येथे विविध सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते.सदर दिमाखदार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डाॅ.खुशालचंद्र बोपचे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात परिसर सुशोभीकरण व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या वृक्षारोपण रोपणाने झाली. यानंतर विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यात आली.blank

विद्यार्थ्यांमध्ये बचतीचे संस्कार रुजवणारी ‘PVM Students Bank’

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच बचतीची आवड आणि आर्थिक शिस्त निर्माण व्हावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेली “PVM Students Bank” ही योजना होय. अध्यक्षांच्या हस्ते या बँकेचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली ही बचत बँक म्हणजे परशुराम विद्यालयाचा एक अत्यंत अभिनव, स्तुत्य आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रम असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमास बक्षीस वितरक म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक जगदीश अग्रवाल, तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच कमलेश राहांगडाले व शिक्षण संस्थेच्या संचालिका श्रीमती सुशीलाबाई बोपचे यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती. याशिवाय शाळा समितीचे अध्यक्ष, माजी विद्यार्थी, पालक वर्ग आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी या सोहळ्याचे साक्षीदार झाले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स.शिक्षक विनोद मेश्राम यांनी केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाचे मुख्याध्यापक कृष्णकांत बिसेन यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पालक, माजी विद्यार्थी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानले.हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. वृक्षारोपण, गुणवंतांचा गौरव आणि ‘PVM Students Bank’ सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून या वाढदिवस सोहळ्याने सामाजिक उत्तरदायित्व, विद्यार्थी विकास आणि बचतीच्या संस्कारांचा एक सुंदर व प्रेरणादायी संदेश दिला.