23.9 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ गोरेगाव येथे युवा संघर्ष लोहार जिल्हा कार्यकारणीचे गठन

गोरेगाव येथे युवा संघर्ष लोहार जिल्हा कार्यकारणीचे गठन

0
12

गोरेगाव ता.१७|०८:-येथील शारदा इन्स्टिटयूट ऑफ फार्मासि्टिकल सायन्स रिसर्च सेंटर सभागृहात रविवार( ता.१६) युवा संघर्ष लोहार समाज संघटनेची सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा युवा अध्यक्ष चिंतेश बावने होते. प्रमुख पाहुणे म्हणुन दुर्गाप्रसाद शेंडे,अविनाश काळे,रवि मेश्राम, मोरेश्वर पंधराम,राजेश सोनवाने, जयप्रकाश शेंडे,राजेंद्र बावने,योगराज बावने उपस्थित होते.
या सभेत युवा संघर्ष लोहार समाज संघटना गोंदिया जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात आली. सर्वप्रथम आमगाव येथे ता ७ ऑगष्ट सभा घेवुन संघटनेचे नाव,अध्यक्ष, सचीव पदाची निवड करुन कार्यकारणीची निवड करण्यात आली. जिल्हा युवाध्यक्ष म्हणुन राजेश सोनवाने, जिल्हा सचिव योगराज बावणे,उपाध्यक्ष जयप्रकाश शेंडे स.अर्जुनी, संजय मेश्राम गोरेगाव, हुमेन्द्रनाथ शेंडे आमगाव,अविनाश काळे गोंदिया,रविकुमार मेश्राम सालेकसा,सहसचिव स्वपनील कोसरे, कोषाध्यक्ष चिंतेश बावणे, कार्याध्यक्ष डुडेश्वर बावनकर, प्रचार प्रमुख डिलेश्वर पंधराम, जिल्हा संपर्कप्रमुख राखेलाल मेश्राम, सल्लाहागर राजेंद्र बावणे, मोरेश्वर पंधराम, विनोद उके, रवींद्र बागडे, व्यकट बावनकर, शालिकराम बावणे,शेषराम लोखंडे, अनिल बावणे, वासुदेव मेश्राम, रवींद्र उके,अनिकेत सोनवाने मेश्राम,खेमराज बागडे, प्रकाश कोसरे यांची निवड करण्यात आली.सुत्रसंचालन राजेश सोनवाने व आभार प्रदर्शन दुर्गाप्रसाद शेंडे यांनी केले