23.9 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ महिलांची छेड काढून अश्लील इशारे करणार्‍यांवर कठोर कारवाई करा

महिलांची छेड काढून अश्लील इशारे करणार्‍यांवर कठोर कारवाई करा

0
12

लोधीटोला येथील महिलांची पत्रकार परिषदेतून मागणी
गोंदिया : गावातील महिलांची नेहमीच छेड काढून अश्लील इशारे करणार्‍या गावगुंडांवर कठोर कारवाई करा अशी मागणी गोंदिया तालुक्यातील लोधीटोला (चुटिया) येथील महिलांनी सोमवारी (ता.१७) स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेतून केली आहे.
मागच्या अनेक दिवसांपासून लोधीटोला येथील रितिक संजय ठाकरे, गुंजन संजय ठाकरे, विकेश भैयालाल गावराने हे युवक गावातील महिलांना पाहून असभ्य वागणूक करीत असतात. एव्हढेच नव्हे तर रस्त्यावरील महिलाना पाहून अश्लील भाषेचा वापर करीत असतात. त्याच बरोबर समोरून येणार्‍या महिला पाहून अंगातील कपडे काढून निर्वस्त्र होणे ही त्यांची नित्याचीच बाब झाली आहे. त्यांच्या या वागणुकीमुळे परिसरातील महिलांना खाली मान करून रस्त्यावरून जावे लागते. यासंबंधात त्यांना जर कुणी हटकले किंवा तक्रार केली तर उलट तक्रारकर्त्यांच्या घरात शिरून सामूहिकपने मारहाण करीत असतात. त्यामुळे परिसरात खास करून महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या प्रकाराला त्यांचे वडील संजय ठाकरे यांचे प्रोत्साहन असल्यामुळे ते अधिकच उघडपणे वागत आहेत.मागच्या चार पाच वर्षात यांच्यावर जवळपास दहा ते बारा गुन्हे दाखल असून बलात्काराचा देखिल गुन्हा दाखल झाला आहे हे विशेष. एव्हढे असूनही पोलिस प्रशासन सदर युवकांवर कठोर कारवाई करताना दिसत नाही. परिसरात अवैध धंदे चालविणे, जुगार खेळविणे, रात्रीबेरात्री अवैध उत्खनन करणे हे त्यांचे नित्याचेच व्यवसाय झाले असून पोलिस प्रशासनाशी त्यांचे आर्थिक हित संबंधित जुळून असल्याने पोलिस प्रशासन पाहिजे तशी कारवाही करताना दिसत नाही. सदर प्रकारा मुळे परिसरातील महिला त्रस्त झाल्या असून सदर गावगुंडांचा तात्काळ बंदोबस्त करा अन्यथा गावातील महिला आपल्या पद्धतीने या गावगुंडाना धडा शिकवतील असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे. पत्रकार परिषदेत पोलीस पाटिल यांच्यासह सर्व समाजातील महिला उपस्थित होत्या.