गोरेगाव : पंचायत समिती अंतर्गत ग्राम जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सोनूटोला येथे अंगणवाडी ते वर्ग ४ मधील विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. पंचायत समितीचे उपसभापती रामेश्वर महारवाडे यांच्या पुढाकारातून या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण व्हाव्यात, या उद्देशाने राबविलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. “शिक्षणासाठी केलेली मदत हीच खरी समाज गुंतवणूक आहे,” अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.या प्रसंगी उपसभापती रामेश्वर महारवाडे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपक्रमाबद्दल पालक आणि ग्रामस्थांनी उपसभापतींचे व शाळा व्यवस्थापनाचे आभार मानत कौतुक केले.





