24.3 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home शैक्षणिक तुमसर येथे बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण; उपसभापती रामेश्वर महारवाडे यांचा अभिनव...

तुमसर येथे बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण; उपसभापती रामेश्वर महारवाडे यांचा अभिनव उपक्रम

0
5

गोरेगाव : शिक्षणासाठी दररोज पायपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी तुमसर ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. पंचायत समितीचे उपसभापती रामेश्वर महारवाडे यांच्या संकल्पनेतून हा कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात आला.

बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना लांबचे अंतर, वाहतुकीची सोय नसणे आणि पावसाळ्यातील अडचणींमुळे शाळेत पोहोचताना त्रास होत होता. या अडचणी दूर करून विद्यार्थ्यांचा प्रवास सुलभ व्हावा व त्यांची नियमित उपस्थिती राहावी, या उद्देशाने हे वाटप करण्यात आले. “शिक्षण मिळण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी मिळाली पाहिजे,” या भूमिकेतून हा निर्णय घेण्यात आला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार असून, पालकांनी व ग्रामस्थांनी या संवेदनशील उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले आहे. ग्रामीण शिक्षण क्षेत्रासाठी हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.