23.4 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home Top News क्रिकेट बुकीच्या प्रतिष्ठानांवर आयकर विभागाचा छापा

क्रिकेट बुकीच्या प्रतिष्ठानांवर आयकर विभागाचा छापा

0
25
xr:d:DAF5wX1s758:569,j:8505471009613425506,t:24032817

गोंदिया, ता १८ ः येथील क्रिकेट बुकी सोंटू जैन यांच्या गोंदियातील निवासस्थान आणि दोन प्रतिष्ठांनावर नागपूर येथील आयकर विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता. १८) छापा टाकला. जयस्तंभ चौकातील हॉटेल लॅवीश इन, गोरेलाल चौकातील कुरतावाला कापड दुकान तसेच सिव्हिल लाइन काका चौकातील जैन यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरूच होती.
मंगळवारी दुपारी नागपूर येथील आयकर विभागाचे पथक गोंदियात दाखल झाले. या पथकाने सोंटू जैन यांच्या दोन प्रतिष्ठान आणि निवासस्थानी छापा टाकला. जवळपास २० ते २२ कर्मचाऱ्यांचे पथक दिवसभर तिन्ही ठिकाणी चौकशी करीत होते. रात्री उशिरापर्यंत आयकर विभागाची कारवाई सुरूच होती. ही कारवाई नेमकी कोणत्या प्रकरणी करण्यात आली, हे अद्याप कळले नाही. विशेष म्हणजे, सोंटू जैन दोन वर्षांपूर्वी क्रिकेट बुकी म्हणून चर्चेत आले होते. क्रिकेट सट्ट्यातून कोट्यवधी रुपयांची कमाई केल्याची बाब उघडकीस आली होती. त्यावेळी नागपूर पोलिसांनीदेखील त्यांच्यावर कारवाई करून काही रोख सोन्याचे दागिने जप्त केले होते.