24.3 C
Gondiā
Wednesday, August 19, 2026
Home विदर्भ तिरोडा न्यायालय परिसरात वृक्षारोपण अभियान; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

तिरोडा न्यायालय परिसरात वृक्षारोपण अभियान; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

0
6

चित्रा कापसे/तिरोडा-पर्यावरण संवर्धन तसेच न्यायालय परिसर अधिक हिरवागार करण्याच्या उद्देशाने वृक्षधरा फाउंडेशन आणि तालुका विधी सेवा प्राधिकरण, तिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी तिरोडा दिवाणी न्यायालय परिसरात वृक्षारोपण अभियान उत्साहात पार पडले.
या उपक्रमास न्यायिक दंडाधिकारी अमित अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ॲड. प्रणय भांडारकर, अजय यादव, देवेंद्र चौधरी, अशोक मलेवार, अकबर अली सय्यद यांच्यासह इतर अधिवक्ता, न्यायालयीन अधिकारी-कर्मचारी, वृक्षधरा फाउंडेशनचे सदस्य आणि पर्यावरण सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान न्यायालय परिसरात विविध प्रकारच्या मोठ्या व सावली देणाऱ्या वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी स्वतः वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.वृक्ष लावणे जितके महत्त्वाचे, तितकेच त्यांचे संगोपन आणि संरक्षणही आवश्यक आहे, यावर यावेळी विशेष भर देण्यात आला. लावलेल्या रोपांची नियमित देखभाल करून त्यांचे मोठ्या वृक्षांमध्ये रूपांतर करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.
वाढते प्रदूषण, तापमानवाढ आणि पर्यावरणातील असमतोल लक्षात घेता वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.न्यायालयीन अधिकारी, अधिवक्ता, कर्मचारी आणि वृक्षधरा फाउंडेशनच्या सदस्यांनी एकत्रितपणे राबविलेल्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.