गोंदिया : राज्याचे उद्योग व मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉ.उदय सामंत हे शुक्रवार दि.21 ऑगस्ट 2026 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.नवेगावबांध ता.अर्जुनी मोरगाव येथे सकाळी 10 वाजता येथे “पुस्तकांचे गाव नवेगावबांध” दालनाचे उद्घाटन व लोकार्पण करणार आहेत.त्यानंतर सायकांळी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात मराठी भाषा विभाग आढावा बैठक तसेच साहित्यिकांसमवेत संवाद साधणार आहेत.