गोंदिया, दि.20 : जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत मागील चार वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून सिंचन प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार 2023-24 ते 2026-27 या कालावधीत निधीचा प्रभावी वापर करून सिंचन क्षमता निर्माण व पुनर्स्थापित करण्यावर भर देण्यात आला.
2023-24 या वर्षात ₹1,219.49 लाख निधी प्राप्त झाला असून ₹762.28 लाख खर्च करण्यात आला. या वर्षात 84 कामे पूर्ण झाली. त्यातून 1716 हेक्टर नवीन सिंचन क्षमता निर्माण झाली, तर 686 हेक्टर सिंचन क्षमता पुनर्स्थापित करण्यात आली. एकूण 2,402 हेक्टर सिंचन क्षमता उपलब्ध झाली.
2024-25 मध्ये ₹967.45 लाख निधी प्राप्त झाला असून ₹852.42 लाख खर्च करण्यात आला. या वर्षात 1,831 कामे पूर्ण झाली. त्यातून 2,464 हेक्टर नवीन सिंचन क्षमता निर्माण झाली व 1,003.20 हेक्टर क्षमता पुनर्स्थापित करण्यात आली. एकूण 3,467.20 हेक्टर सिंचन क्षमता उपलब्ध झाली.
2025-26 मध्ये ₹1,555.22 लाख निधी प्राप्त होऊन ₹990.36 लाख खर्च करण्यात आला. या वर्षात 5,136 कामे पूर्ण झाली. त्यातून 5,962 हेक्टर नवीन सिंचन क्षमता निर्माण झाली, तर 2,384.80 हेक्टर क्षमता पुनर्स्थापित करण्यात आली. त्यामुळे एकूण 8,346.80 हेक्टर सिंचन क्षमता उपलब्ध झाली.
2026-27 मध्ये आतापर्यंत ₹2,657.23 लाख निधी प्राप्त झाला असून ₹1,888.31 लाख खर्च करण्यात आला आहे. या कालावधीत 238 कामे पूर्ण झाली. त्यातून 5,236 हेक्टर नवीन सिंचन क्षमता निर्माण झाली व 2,094.40 हेक्टर सिंचन क्षमता पुनर्स्थापित करण्यात आली. एकूण 7,330.40 हेक्टर सिंचन क्षमता उपलब्ध झाली. तसेच 217 कामे प्रगतीपथावर आहेत.
एकूणच, चार वर्षांच्या कालावधीत सिंचन प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात खर्च करून हजारो हेक्टर क्षेत्रासाठी सिंचन क्षमता निर्माण व पुनर्स्थापित करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा वाढण्यास मदत झाली असून कृषी उत्पादन वाढीस चालना मिळण्याची अपेक्षा आहे.





