देवरी, दि.२४- देवरी तालुक्यातील चिचगड पोलिस स्टेशन हद्दीत घडलेल्या विविध गुन्ह्यात जप्ती करण्यात आलेल्या दुचाकी वाहनांचा लिलाव गेल्या २२ ऑगष्ट रोजी करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, चिचगड पोलिस स्टेशन अंतर्गत घडलेल्या गुन्हेगारी प्रकरणात पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतलेल्या वाहनांचा लिलाव करून विक्री करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सदर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी देवरीचे उपविभागीय अधिकारी यांनी दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या आदेशाची अमलबजावणी करण्यात आली. सदर लिलाव प्रक्रियेमध्ये एकूण ५ दुचाकी वाहनांचा समावेश होता. या मध्ये हिरो होंडा, टीवीएस आणि होंडा कंपनीच्या वाहनांचा समावेश असून एकूण ५ वाहनाच्या लिलावातून जमा झालेली रक्कम १ लाख १२ हजार चलान द्वारे बॅंकेत जमा करण्यात आल्याची माहिती पोलिस विभागाने दिली आहे.





