👉वाहकाला विजेचा धक्का तर चालक थोडक्यात बचावला👉मोठा अनर्थ टळला
संगमेश्वर:-संगमेश्वरहून उमरेकडे जाणाऱ्या एसटी बसवर अचानक विद्युतवाहिनी कोसळल्याने फणसवणे-उमरे फाट्यावर आज बुधवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास थरारक प्रसंग घडला. धावत्या बसवर विद्युतवाहिनी पडल्याने वाहक प्राजक्ता शिगवण यांना विजेचा धक्का बसून किरकोळ दुखापत झाली. चालक रवींद्र साप्ते यांनी प्रसंगावधान राखल्याने ते सुरक्षित राहिले. बसमध्ये त्यावेळी केवळ एकच प्रवासी असल्याने मोठी जीवितहानी टळली.





