24.4 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home Featured News अमृत आहार योजनेच्या लाभार्थ्यांशी पुलकुंडवार यांनी साधला संवाद

अमृत आहार योजनेच्या लाभार्थ्यांशी पुलकुंडवार यांनी साधला संवाद

0
38

गोंदिया,दि.२४ : आमगाव तालुक्यातील सोनेखारी व बघेडा येथील अंगणवाडी केंद्रांना जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नुकतीच अचानक भेट देवून अमृत आहार योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिला व बालकांना योग्यप्रकारे आहार मिळत असल्याची खात्री केली. महिला लाभार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. महिलांना त्यांच्या उपस्थितीत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी जेवण दिले. बघेडा येथील अंगणवाडीतील मुलांना भेट देवून खिचडी भरविली. सोनेखारी व बघेडा येथील लाभार्थी बालकांशी सुध्दा संवाद साधला. डॉ.पुलकुंडवार यांनी सुध्दा अंगणवाडीतून पोषण आहार, अमृत आहार व शालेय पोषण आहाराचा प्रत्यक्ष एक एक घास खाऊन योग्य असल्याची खात्री केली.

blank